मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयय कट्टा या प्रशालेतील कलाशिक्षक श्री. समीर चांदरकर व प्रशालेतील विद्यार्थिनी श्रेया चांदरकर, रिया भगत, ममता अंगचेकर या विद्यार्थ्यांनी मिळून नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांची साकारलेली रांगोळी लक्षवेधी ठरत आहे. रांगोळीच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल कौतुक होत आहे. यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक यांनी मार्गदर्शन केले तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर व सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.