सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणून परीमल नाईक यांनी शपथ घेतली, आपण वर्षभरात समाजपयोगी उपक्रम राबवून लायन्स क्लब चे नाव उज्वल करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
परीमल नाईक यांची सावंतवाडी लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. मालवणचे गणेश प्रभुलकर यांनी त्यांना शपथ दिली याप्रसंगी ज्येष्ठ सदस्य केशव फाटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन नाईक यांनी केले या समारंभाला नवीन कार्यकारिणी पदाधिकारी सचिव अमय पै प्रथम उपाध्यक्ष विद्याधर तावडे द्वितीय उपाध्यक्ष दत्तू नार्वेकर खजिनदार प्रसाद राऊत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सदस्यांनी नूतन अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.