वाढदिवस रक्तदान करून केला साजरा
पोईप / ओंकार चव्हाण : मालवण तालुक्यातील हेदूळ गावचे सरपंच नंददीपक गावडे यांचे चिरंजीव कन्हैया गावडे यांचा आज २२ वा वाढदिवस असून ते दरवर्षी आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा करतात. यावर्षीही त्यांनी लाईफटाईम हॉस्पिटल-पडवे येथे जाऊन रक्तदान केले. यावेळी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी कन्हैया गावडे यांचे पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले. या सामाजिक कार्यातून कन्हैया गावडे यांनी नव्या पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे.