या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ७ शिक्षकांची निवड
५ सप्टेंबर या शिक्षकदिनी होणार पुरस्कार वितरण सोहळा
शिरगाव / संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव-आंबेखोल येथील प्रशालेचे उपशिक्षक बापू सोनू खरात यांना नुकतात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी ७ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.या पुरस्काराचे वितरण ५ सप्टें.रोजी मान्यवरांच्या हस्ते ओरोस येथे होणार आहे.
बापू खरात यांनी साळशी-धनगरवाडी या प्रशालेत सन २००३ ते २००८ पर्यंत शिक्षणसेवक म्हणून काम केले.त्यानंतर शिरगाव-चौकेवाडी या प्रशालेत २००८ ते २०१९ पर्यंत त्यानंतर शिरगाव-आंबेखोल प्रशालेत उपशिक्षक म्हणून सध्या ते कार्यरत आहेत.अतिशय मनमिळवू,अभ्यासूवृत्ती आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची शिरगाव परिसरात ख्याती आहे.त्यांना यापूर्वी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती-देवगड शाखेचा २०२० चा ‘उपक्रमशील गुणवंत शिक्षक पुरस्कार’,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती यांच्यावतीने दिला जाणारा ‘गुरुवर्य सानेगुरुजी पुरस्कार’कोरोना आपत्ती काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू रहावे यासाठी प्रयत्न केल्याने या कामाची दखल घेऊन शब्दगंध समूह प्रकाशन,दैनिक स्वराज्य तथा ग्रंथमित्र युवा मंडळ-औरंगाबाद यांच्याकडून ‘महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’,रंगोत्सव सेलिब्रेशनचा ‘कलागौरव’ पुरस्कार, सन २०१९-२० मध्ये सलाम मुंबई फाउंडेशन व शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांच्यावतीने ‘तंबाखूमुक्त शाळा पुरस्कार’, उमेद फाउंडेशन चा ‘कोरोना योद्धा पुरस्कार’, तसेच त्यांनी कोरोना लॉकडाऊन काळात शिरगाव-आंबेखोल येथे ‘बालकांच्या शिक्षणासाठी पालकांची शाळा’हा अभिनव उपक्रम त्यांनी राबविला त्याला पालकांनी,ग्रामस्थांनी चांगले सहकार्य दिले.
बापू खरात यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ.शैलजा साटम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विद्यानंद चव्हाण,ग्रामस्थ,पालकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.