26.9 C
Mālvan
Thursday, December 5, 2024
IMG-20240531-WA0007

माजी सरपंच सतीश प्रभू यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : बांदिवडे गावचे सुपुत्र व जेष्ठ शिवसैनिक सतीश मुकुंद प्रभू (६७ वर्ष) यांचे राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. मुंबई येथे शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात मोठे योगदान त्यांचे लाभले होते. बांदिवडे येथे गावी आल्यानंतर शिवसेना शाखा स्थापण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. माजी सरपंच म्हणून सुद्धा त्यांनी गावात विकासात्मक कार्यात सहभाग दर्शवला होता. मालवण तालुका संजय गांधी निराधार समितीचे ते माजी अध्यक्ष होते. पंचक्रोशीतील विविध विकासात्मक योजनांमध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य होते. अनेक गोरगरीब लोकांना मदतीचा हात त्यांनी दिला होता. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान होते. शिवसेनेच्या जिल्हास्तरीय अनेक आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले होते. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. आचरे बाजारपेठ येथे त्यांचे स्टेशनरीचे दुकान सुद्धा होते. मागील काहिवर्षे मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास होता. अंतिम संस्कार सोमवारी सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहेत. पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : बांदिवडे गावचे सुपुत्र व जेष्ठ शिवसैनिक सतीश मुकुंद प्रभू (६७ वर्ष) यांचे राहत्या घरी अल्प आजाराने निधन झाले. मुंबई येथे शिवसेनेच्या प्रारंभीच्या काळात मोठे योगदान त्यांचे लाभले होते. बांदिवडे येथे गावी आल्यानंतर शिवसेना शाखा स्थापण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. माजी सरपंच म्हणून सुद्धा त्यांनी गावात विकासात्मक कार्यात सहभाग दर्शवला होता. मालवण तालुका संजय गांधी निराधार समितीचे ते माजी अध्यक्ष होते. पंचक्रोशीतील विविध विकासात्मक योजनांमध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य होते. अनेक गोरगरीब लोकांना मदतीचा हात त्यांनी दिला होता. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात त्यांचे मोठे योगदान होते. शिवसेनेच्या जिल्हास्तरीय अनेक आंदोलनात त्यांनी नेतृत्व केले होते. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. आचरे बाजारपेठ येथे त्यांचे स्टेशनरीचे दुकान सुद्धा होते. मागील काहिवर्षे मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास होता. अंतिम संस्कार सोमवारी सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहेत. पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

error: Content is protected !!