कणकवली | प्रतिनिधी : गणेशोत्सवाची लगबग बाजारात सुरू झाली असून सजावटीचे साहित्य दाखव झाले आहे. यंदा पर्यावरण पूरक दिसत आहे. थर्माकोल वापरावर बंदी असल्याने बाजारात लाकडी, सनबोर्ड, पुठ्ठा, वेलवेट, कापडी, कार्डबोर्ड पेपर, रबर सीट यापासून बनवलेले पर्यावरण पूरक मखर उपलब्ध आहेत. थर्माकोलच्या माखरांपेक्षा या मखरांच्या किमती अधिक आहेत. या प्रकारचे मखर बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कारागीर, मेहनत जास्त लागत असल्याने दर अधिक असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कणकवली बाजारपेठेत गणेशोत्सव सजावट साहित्य तसेच विविध कलाकुसर केलेले मखर ग्राहकांचे लक्ष वेधुन घेत आहेत. या माखरांनी पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मागणीनुसार तयार करून ठेवण्यात आले आहेत. आतमधून पुठ्ठा आणि सजावटीसाठी विविध रंगाचे कार्ड बोर्ड पेपर वापरून हे मखर तयार करण्यात आले आहेत. त्यावर विविध प्रकारच्या लेस, मणी लावून सजावट करण्यात आली आहे.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -