मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथील MSAT विभागाअंतर्गत १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश कॅश्यु फॅक्टरी विरणचे मालक श्री सुरेश नेरूरकर उपस्थित होते. दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी.एच .कुबल यांनी केले. प्रमुख पाहुणे उद्योजक श्री सुरेश नेरूरकर यांनी युवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवसाय व उद्योग यावर भर देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.सद्या युवकांचा कल शहराकडे असल्याची खंत व्यक्त केली.मात्र स्वतःचा व्यवसाय उद्योग स्थापन करून इतरांना रोजगार मिळवून दिला तर मुंबई पुणे सारख्या शहरांकडे वळलेल्या युवकांचा ओढा थांबेल असे मत व्यक्त केले. ज्या विद्यार्थ्यांना व्यवसाय उद्योग स्थापन करायचा असल्यास आपण त्यांना वेळोवेळी सहकार्य करू अशी ग्वाही दिली. MSAT विषयाच्या सर्व विद्यार्थ्यानी स्वतःच्या कौशल्याचा वापर करून विविध प्रकारचे पदार्थ तसेच विविध प्रतिकृती , विणकाम केलेल्या शिलाई काम केलेल्या वस्तू शेती उपयोगी अवजारे , शेती ला आवश्यक सेंद्रिय कीटक नाशक, जीवामृत ,पोटॅश यांचे शाळेच्या आवारात प्रदर्शन भरविले होते. विद्यार्थ्यांनचा उत्साह आणि कौशल्य पाहून श्री नेरूरकर भारावून गेले. या प्रदर्शनासाठी MSAT विभागाचे निदेशक श्री जगन्नाथ आंगणे, श्रीम हर्षदा पाटकर , श्रीम कविता माडये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.वेदिका दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम केळुसकर यांनी केले यावेळी विज्ञान शिक्षिका सौ सनये, ज्येष्ठ लिपिक श्री महेश गावडे, शिपाई श्री गुरुदास हडकर उपस्थित होते.