पाण्याऐवजी चक्क जंगलातून प्रवास
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनोहर गडाच्या माथ्यावर नुकतेच विस्मयकारी माश्याचे अस्तित्व सापडून आले आहे. समुद्र सपाटीपासून २००० फूट उंचीवरील ऐतिहासिक मनोहर गडाच्या पाण्याचा कुठलाही सोर्स उपलब्ध नसताना या माश्याचे अस्तित्व आढळून आले आहे.
कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कुल चे विज्ञान शिक्षक पृथ्वीराज बेर्डे यांना हा दुर्मिळातील दुर्मिळ असा आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेला मासा सापडला. काही दिवसांपूर्वी बेर्डे हे सहकाऱ्यांसह ऐतिहासिक मनोहर गडावर केले असता गडाच्या माथ्यावरून मनसंतोष गडाच्या सुळक्याच्या दिशेने जात असताना त्यांना तेथील गवतामध्ये हा अदभूत मासा सापडून आला. दरम्यान त्या माशाची विडिओ करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
बर्डे यांनी महाराष्ट्रातील अनेक जीवतद्यांना हा व्हिडिओ पाठवून माहिती घेतली असता, तो ‘ईल’ प्रजातीतील मासा असल्याचे स्पष्ट झाले. या माशाबद्दल मिळालेली माहिती अशी की, हा मासा ‘ईल’ कुळातील असून तो ‘बॉम्बे स्वाम्प ईल’ या नावाने ओळखला जातो. ‘ईल’ कुळातील मासे हे इतर माशापेक्षा वेगळे असतात. स्थानिक भाषेत ‘वाम’ किंवा ‘हैर’ नावाने हे मासे ओळखले जातात.