मसुरे । प्रतिनिधी : गोवा विमानतळ प्राधिकरण सीएसआर निधी व जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नाने मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल या प्रशाले मधील दहा गरीब गरजू होतकरू विद्यार्थिनींना सायकलचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जन शिक्षण संस्थेचे आणि हडी गावचे माजी सरपंच विलास हडकर यांनी जन शिक्षण संस्थेच्या कार्य कामकाजाचा आणि सायकल वाटप करण्याचा मुख्य उद्देश उपस्थितांना सांगितला. यावेळी बोलताना मसुरे एज्युकेशन सोसायटीचे लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे म्हणाले, मिळालेल्या सायकलचा उपयोग येथील विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी व शारीरिक दर्जा वाढविण्यासाठी करावा तसेच आज या दहा सायकल मधून आम्ही या प्रशालेत १०० सायकलींची सायकल बँक उभारू असे आश्वासन दिले. माजी जि.प. अध्यक्ष सरोज परब म्हणाल्या, खासदार सुरेश प्रभू यांचे कार्य आज देशभरात जोमाने सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज या मुलींना ज्या दहा सायकली उपलब्ध झाल्या आहेत हे कार्य कौतुकास्पद असे आहे. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महेश बागवे, माजी जी प अध्यक्ष सौ सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, राजन परब, विलास मेस्त्री, मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई चे उपाध्यक्ष उत्तम राणे, अल्प संख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष यासीन शेख, प्रभारी मुख्याध्यापक एस बी चौगुले, रमेश पाताडे, एस व्ही पिंगुळकर,एन एस जाधव,बी एस ठाकूर, एस जी वाघमारे, के जी घाटे, भानूदास परब, महेश वंजारे, अनिल मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एस ठाकूर व आभार प्रभारी मुख्याध्यापक एस बी चौगुले यांनी मानले. प्रशालेतील विद्यार्थिनींना सायकल उपलब्ध करून देण्यासाठी जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष लक्ष्मी दत्तप्रसाद पेडणेकरआणि भाजप माजी मालवण तालुका अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी विशेष पाठपुरावा केला होता.