मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव आणि महाराष्ट्र शासन तालुका कृषि विभाग देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदळे भंडारवाडी येथे प्रगतीशील शेतकरी सुनील कुलकर्णी यांच्या शेतामध्ये श्री पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत ऋतुराज सावंत, प्रद्युम्न माईणकर, पंकज आंबेरकर आत्माराम माळकर, प्रज्योत परब, सगीरी सुजीवराज मुलिन्ति, लक्ष्मी किशोर रेड्डी, आत्मकुरी वसंत राज रेड्डी, कृषि पर्यवेक्षक श्री. ए. पी. आपटे व कृषि सहायक श्रीम. व्ही.एस. तिरवडे यांनी उपस्थित शेतकर्यांना पारंपारिक शेती पेक्षा श्री पद्धतीने भात लागवडीचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले
यावेळी हिंदळे सरपंच स्वरा पारकर, जेष्ठ व अनुभवी शेतकरी श्री वसंत कुलकर्णी, वनिता कुलकर्णी व स्थानिक शेतकरी आदि उपस्थित होते.
याच पद्धतीने हिंदळे गावमध्ये कृषीदूत व कृषी विभाग देवगड यांच्या मार्गदर्शनाखाली अशी प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत.