मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा ओसरगावं नं १ या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमा अंतर्गत सुप्रिया अपराध यांच्या शेतीत प्रत्यक्ष शेतात उतरून सध्या चालू असलेल्या भात शेतीचा अनुभव घेतला.बळीराजासोबत त्याच्या शेतात भात लागवडीच्या कामात सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत शेतीची कामे केली.शेतीतील कामाचा अनुभव घेतला.यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुप्रिया अपराध मुख्याध्यापक किशोर कदम , व शिक्षक राजश्री तांबे, मोडक, विलिस चोडनेकर, कृषीसहाय्यक संकेत टेळे व पालक , शेतकरी उपस्थित होते यावेळी श्री पद्धतीने भाताची लागवड .चे प्रात्यक्षिक कऱण्यात आले.