रामेश्वराक शरण आणि मालकाचे चरण….!
बुधवार आणि रविवार म्हणले की माडी छपरांत निसती दिसभर जत्रा..!
गावातले जवळपास पन्नास टक्के माडीप्रेमी बुधवाराक आणि रविवाराक बंड्या गांवकराच्या छपराच्या आसर्याक नक्कीचे येणारेच.
पण पहिल्या इरडीत तशी तितकी गर्दी नसायची.
रोजच्या हजेरीचेच वीस पंचविस जण आपले थय त्यांचो कार्यभार चालू ठेई होते पण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर थय एकच गलको सुरु होई.
गर्दी बघल्यान काय बंड्याशेठचो कॅशीयर कामदार स्वप्नो तसो सरबरान जानारो प्राणी म्हणान बंड्याशेठ गांवकार स्वतः बुधवारी आणि रविवारी संध्याकाळचो दोन तासतरी थय येवन बसा होतो.
इठू,रतनो आणि शैलो संध्याकाळचे फार कवचित हजेरी लाई होते कारण इठू आणि रतन्याक दर्यात जावचा लागा आणि शैल्याक कायतरी बारिकसा काम गावला की तो थेतूरसून थेट घराकच जाई होतो.
माडी छप्पर साधारण आठ साडेआठाक बंद होवन जाई पण ह्या दोनचार तासात थय पैशाचे मोठे उलाढाली होवन जाईत.
संध्याकाळच्या गिर्हाईकात गुरु,बाबू,प्रशांत,संदीप,संदेश अशी नावा रोजची होती.
ही मान्सा मजुरी कामावाली आसल्या कारणान रोज दिसभर काम करुन नंतर आपापली तहान भागवुक बंड्याशेठच्या छपरात येईत.
बंड्याशेठच्या खास मानसात ही नावा नसली तरी छपराच्या अलिखित रजिस्टरात ही मान्सा नक्कीच होती.
पण एक इषय खूप महत्वाचो होतो आणि तो म्हणजे संध्याकाळचो काळोखपडासर ह्या माडी छपरात जाणा ही एक खूप मोठी जोखिम असल्यासारखीच होती.
ह्या माडी छप्पर गावाच्या वायच बाहेर असल्याकारणान थय संध्याकाळी फिराक येणार्यांची संख्या बरीच होती.
कोणी व्यायाम म्हणान,कोणी हवा खावक तर कोणी येळात येळ काढून आग्रारचा म्हणजे खाजनातला निसर्ग सौंदर्य बघूक म्हणान थयना जाई होतो.
चुकान कधी स्वप्न्याक माडी छपरात येवक उशिर झालोच तर थयना येनारो जानारो अगदी स्पष्टपणान सगळ्या माडीसाठी ताटकळलेल्या प्लेअरांका बघू शका होतो आणि झालाच तर गावभर आरडपण घाली होतो.
अशीच एका रविवारी स्वप्न्यान माती खाल्यान….!
साडेपाच झाले तरी त्याचो कायच पत्तो नाय आणि फोन लागा नाय.
बंड्याशेठचो नंबरपण कवरेज क्षेत्राच्या बाहेर लागा होतो.
दोनचार दोनचारच्या घोळक्यात आता तीस एक जणतरी थय येवन तगमगा होते.
छपराचो दरवाजो चुडताचोच होतो तरी कोणी जबाबदार माणुस नसल्या कारणान तो उघडून भुतूर रिगाची तशी कोनचीच बिशाद नव्हती. सकाळची माडी भुतूर शिल्लक आणि रविवारची जादाची साठ एक लिटर माडी दोन कॅनात भरुन आसल्याकारणान न जाणे हिशोब जुळलो नायतर भुतूर इलेल्या सगळ्यांच्याच दरवाजो खोललेल्याचो व्यापार आंगलट येवची दाट शक्यता होती म्हणान सगळे रस्त्यारच घुटमळा होते नी तळमळा होते.
सहा वाजले तसा बंड्याशेठचा थय आगमन झाला.
सगळ्यांका बाहेर बघून तो इचारात पडलो.
बंड्याशेठना त्याची ‘डस्टर’ कार रस्त्याच्या कडेक लावल्यान आणि काच खाली करुन संदीपाक बोलावन घेतल्यान.
बंड्याशेठना हाक मारल्यान म्हणून बिनपिसाचो मोर झालेलो संदीप धावत कारकडे गेलो आणि म्हणलो, ” काय मालक…असा काय..स्वप्नो खय..?”
बंड्याशेठना फोनात ढवळीत त्याका सांगल्यान ,” अरे माका काय म्हायत. ..?
मी तुमका इचारतं ह हय…
दुपारी तिनाक बंद केलंय दुकान असो फोन केलेल्यान माका.
नंतर त्याचो फोनच बंद येता हा.
आज एक्टिव्हा कामाक टाकली हा म्हणान चलत नायतर कोनचीतरी लिफ्ट मागून गेलो आसतलो घरी.
तरी मेल्यान फोन कशाक बंद ठेवल्यान हा..?”
आता संदीप कायतरी बोलाचा म्हणान बोलान गेलो ,” कामगार ते कामदारच ओ…शेवटी त्यांका मालकाची आणि धंद्याची थोडीच पडली हा…?’
संदीपाचा ह्या बोलणा ऐकान बंड्याशेठना फोनातलो लक्ष काढून संदीपाकडे बघल्यान आणि वायच तापलेल्या आवाजात तो बोललो ,” काय बोललं…? कामदार ते कामदार काय.
मग मायझया तू जो इलेक्ट्रिक फिटींगा मारुक देसाई काॅन्ट्रॅक्टराकडे आसं तो काय मालक बनान आसं काय रे त्या देसायाचो. .?
तू पण कामदारच म रे..?
म्हणजे तुकापण देसायाची आणि त्याच्या धंद्याची कायच किंमत नसतली…..बरोबर…?”
आता संदीप शाप वरामलो आणि त्याका काय बोलायचा ता सुचाचाच बंद झाला. तरी आपलो कसनुसो तो ,” काय मालक…तसा नाय ओ…!” म्हणत मान खाली घालून रवलो.
स्वप्न्याचो फोन लागना नाय म्हणल्यार नाईलाजान बंड्याशेठ कारचे काची बंद करुन खाली उतारलो.
खरातर बंड्याशेठला खयल्यातरी पतसंस्थेच्या वार्षिक मिटिंगेक जावचा होता पण नेमको स्वप्न्याचो गोंधळ झालो म्हणान तो भुतुरना वैतागलेलोच होतो.
पण दुकानासमोरचा गिर्हाईक आणि रविवारची म्हणान खास संध्याकाळसाठी मागवलेली साठ लिटर जादा माडी खपाकच होयी ह्या उद्देशान त्याना छपराचो दरवाजो ढकलल्यान.
दरवाजो उघडून बघता तर काय स्वप्नो भुतूरल्या बैठ्या फळीर आरामात ताणून देवन निजलेलो होतो..!
बंड्याशेठचा मात्र आता सनाकला.
त्याना जोरात आरड घालित म्हणल्यान, ” ए ,रेड्या स्वप्न्या.
अरे आज रविवार आणि थेतूर तू दुकानात भुतूर आसान दरवाजो लावन कसो रे निजलं…?
उठ…..
बाहेर गर्दी बघ मेल्या…!”
बंड्याशेठचो भरदार आवाज ऐकान स्वप्नो खाडकन् उठलो.
डोळे चोळीतच त्याना ,” किती वाजले…? श्या…शाप डोळो लागलो ओ काका..!” म्हणत अंगात शर्ट चढवल्यान.
“नशिब ,सकाळ दुपारची ग्लासा धुवून ठेवलं हं…
जा बावडेर त्वांड धुवून ये…तवसर मी गिर्हाईक करतंय ..मगे माका मिटिंगेक जावचा आसा”, म्हणत बंड्याशेठना एकेका गिर्हाईकाक बाटले नि ग्लासा देवक चालू केल्यान.
जसजसो काळोख पडा तसतशे काहीजण छपराच्या भुतूर न बसता बाहेर रस्त्याच्या कडेक हवा खाईत माडी टाकीत बसले.
एकदा काळोख झालो आणि एखादी बाटली पोटात गेली काय मगे मांजरासारखो भियत इलेलो माणुसपण एकदम ‘रजनिकांत वाघमारे’ बनान बिनधास्त बाहेर फिरा नायतर बाहेर बसा होतो ..!
जवळपास सगळ्यांच्याच चोचीत माडी पोच झाल्यार स्वप्नो त्वांड धुवून छपरात इलो.
बंड्याशेठने त्याका इतको वेळ झोपाचा कारण इचारल्यान तर स्वप्नो म्हणलो ,” बंड्याशेठ. .आज एक्टिव्हा नाय म्हणान दुकान बंद केल्यार कोनचीतरी लिफ्ट बघी होतंय .
पण एक जण थांबात तर शप्पथ..!
नंतर गुरुक फोन केलंय तर तो गाडी घेवन येतंय म्हणलो.
अर्धोतास उलाटलो तरी तो काय येवक नाय.
तवसर चार वाजान गेले.
उन्हाचो घराकडे चलत जावन परत चलत येवच्यापेक्षा हयच थांबाया म्हणलंय…कारण आज रविवार.
माझ्या मोबाईलाचा चार्जिंगपण उतारला. ..!
उन खूप म्हणान गोड्या माडियेचो एक ग्लास सरबत म्हणान पिलंय आणि एक चन्याचा पाकिट फोडून खालंय.
तवसर साडेचार झाले म्हणान म्हणला अर्धोतास पाठ टेकवया तर शाप डोळो लागलो.
धुंदी इली वाटता माका माडियेची. ..!
सवय नाय ना ओ मालक !”
आता बंड्याशेठला हसाक इला. पण तो गंभीर चेहर्यानच स्वप्न्याकडे बगित होतो.
स्वप्नो तसो वीस वर्षांचोच पोरगो होतो.
अजून त्याका कसला व्यसन लागाक नसलेला ह्या बंड्याशेठला म्हायत होता.
स्वप्न्याक जवळ बोलवुन त्याना सांगल्यान ,” ह्या बघ..ही धुंदी इली,ही जाणिव वगैरे सगळा इसरान जा.
देव रामेश्वराक मनापासना पाया पड आणि त्याका शब्द दी की परत तू कधिच असल्या पदार्थांक पिवचं नाय.
लहान आसं तू.
गेली तीन वर्षा आसं माझ्याकडे. माडियेचो अगदी रोखठोक व्यवहार सांभाळतं ह.
बारावीपण शिकलं ह.
तुका एका पतसंस्थेत क्लार्क म्हणान ठेवची माझी इच्छा आसा.
अरे हयसर काय कोणय अंगठाछापपण धंदो सांभाळीत पण तू जितक्या शिकलं हं त्याचो तुकातरी उपयोग होवकच होतो.
तुका आवस बापु नाय हत ही तुझी कमजोरी ठरता नये तर ती तुझी शक्ती बनाक होयी.
पण एकदा काय नशेचा कायतरी तुझ्या टकलेत घुसला आणि भिनारला ना तर राजा थेतूरसून तुका मी पण बाहेर नाय काढू शकनंय .
आज तू अजानतेपणी चुकलं हं..!
काय झाला आसता जर ता ग्लास न पिता झोपलं आसतं तर..?
वायच गर्मी झाली आसती पण तू सावध तरी रवलं आसतं .
रविवारच्या धंद्यासाठी म्हणान तू काळजीन आणि जेवाण चुकवून छपरात थांबलं पण एका ग्लासान तुझ्या चांगल्या उद्देशाक कसा लोळवून टाकल्यान ता बघलं..?
परत नको हा ही धुंदी.
आता मी त्या पतसंस्थेच्याच मिटिंगेक चललंय. तुझ्यासाठी थय शब्द टाकलेलोच आसय.
दोन तीन महिन्यांतच तुका थय नोकरी गावातली.
चल. खूप उशीर झाले आधीच.
तो पतसंस्थेचो अध्यक्ष माझी वाट बघित आसतलो.
माझे दोन तीन मोठे ठेवी थय आसत म्हणान माझो सत्कार ठेवल्यानी आसा.
पण त्या सत्कारापेक्षा तुझ्या थयल्या नोकरेचो खुटो बळकट करुक थय चललं हय मी…!
माडी शिल्लक रवली तरी चलात .उद्या खाटी मागणारे काय कमी नाय हत.
दुकान आठाकच बंद कर. कळला काय आणि जाताना आपल्या चायनिजच्या हाॅटेलात जावन जेव.
बरो निजान ताजो हो रात्री.
उद्या सोमवार. सकाळी गर्दी आसतली.
मीपण येईन इलंय तर…चल….स्वप्न्या!”
स्वप्न्याच्या डोळ्याक आता पाणियाचे धारे लागलेले.
आठवीत आसताना त्याचे आवस बापुस दर्यात बुडान गेल्यारय तो इतको कधीच रडलो नव्हतो पण आज ढसाढसा रडा होतो.
ह्या सगळा बोलणा छपराबाहेरना संदीपान ऐकलेला होता .
बंड्याशेठ कारमध्ये बसान गेल्यार संदीप भुतूर येवन स्वप्न्याक म्हणलो ,” खूप देव मालक माणुस गावलो आसा तुका.
मगाशी तू दिसाक नाय म्हणान तुका बडबडलंय तर ता पण त्याना ऐकान घेवक नाय…उलटी माझिच साला काढल्यान रे…!
रामेश्वराचे चरण म्हणजे तुझ्यासाठी तुझ्या मालकाचेच शब्द आणि त्याची माया आसा रे…
कधी नको दुखवू हां त्याका…कधीच नको.!”
बंड्याशेठची कार सरळ रस्त्यारना दिसेनाशी झाली तशी स्वप्न्यान मनोमन बंड्याशेठला नमस्कार केल्यान आणि परत कधी धुंदी देणार्या नशेच्या वस्तूक हात न लावची स्वतःकच शप्पथ दिल्यान.
आता गिर्हाईकाची माडी पिवन झालेली ग्लासा आणि बाटले धुवूक घेवन त्याना देवाक बत्ती लावल्यान आणि रोजच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळची एक इडी मेणबत्तीर पेटवून छपराच्या दारा समोरच्या निसार ठेवल्यान.
स्वप्नो आता हळूहळू बाजार कवळूक घेणार होतोच तितक्यात अंधारात बॅटरी घेवन एक बाई आरड घालित थयसर इली.
” खय गेले ते ….आसत खय….
आये गे…काय वास मारता हा आमटानिचो. ..श्या. …!”
संदीपान तो आवाज ऐकल्यान आणि तेचे शाप कपाळात गेले.. !
तो आवाज संदीपाच्या बायलेचो होतो.
आता संदीपाक लपान रवण्यात अर्थच नव्हतो कारण बायलेन छप्परभर बॅटरीचो झोत टाकल्यान तेंव्हा भुतूर बैठ्या फळीयेर ठेवलेली त्याची इलेक्ट्रीक सामायन दुरुस्तिची हत्यारांची पिशी दिसलेलीच.
“अगो….काय गे..हय खय..?
मी वायच बंड्याशेठच्या हाॅटेलात जाई होतंय ट्यूबलाईट बसवक म्हणान हय त्यांका भेटाक इलेलंय. …
चल चल…जावचा आसा थयच. ..!”
आता संदीपची बायल आणखी भडाकली आणि डोळे मोठे करीत गराजली, ” कसला याक याक कानात देवचा मशीन आसास ओ तुम्ही!
पाच वाजल्यापासना हयसर पडान आसास.
माझी मैत्रीण आसा ना सुरेखा ,ती तिच्या चेडवावांगडा हयसर संध्याकाळचा चलाक इलेली. ..
तिना तुमका ह्या बंद दुकानासमोर तहानलेल्या बाळासारखे तळमळताना बघल्यान .
आणि परत जाताना बाहेर दाबात बाटले घेवन ‘हा हा हू हू ‘ करतानाय दिसलात तुम्ही तिका. ..
तिनाच फोन लावन सांगल्यान माका..
आता आणखी पुडिये सोडू नको..
बास झाली पिलास तितकी. ..
चला. ..पयले घराक.
रविवार म्हणान कोंबो कापलं हव तर तुम्ही हय मोरपिसारो फुलवून बसला आसास…!”
संदीपाची हवा आता शाप टाईट झालेली.
तीन बाटल्यांचे पैशे चुकते करुन त्याना त्याच्या हत्यारांची पिशी उचलल्यान आणि स्वप्न्याकडे रागान बघात म्हणालो..,” अक्करमाश्या. …दुपारी एक ग्लास मारुन धुंद जावन कलाटलं नसतंस तर टायमार पिऊन घराक पोचनार आसतंय.
दुकान उशिरा उघाडला म्हणान बाहेर दिसलंय तो दिसलंय आता घराकडे नेऊन बायल परत खळ्यात निजाक लाइत तर भीती रे ……!”
सगळ्या परिस्थितीत हसू दाबित स्वप्नो म्हणलो ,” माफ करा ओ दादानु. …
माका काय म्हायती की तुमच्या बायलेच्या मैत्रिणीचो तुमच्यार इतको खास डोळो आसा तो…..?…हा..हा..!”
सगळी आवराआवर झाल्यार स्वप्न्यान माडी छपरातल्या श्री देव रामेश्वराच्या तसबिरीक हात जोडीत म्हणलो,” देवा रामेश्वरा…आजच्या माझ्या माडियेच्या घोटासाठी तुझी माफी मागतंय…तुका मी शरण जातंय. माझ्या मालकाच्या म्हणजे बंड्याकाकांच्या चरणातच मी रवान कायम.. त्यांच्या दाखवलेल्या चांगल्या मार्गाचा आचरण करुची बुद्धी आणि ताकद माका दी…!”
लेखक :सुयोग पंडित ©Suyog Pandit.
(टीप: कथेतील सर्व पात्रे,नांवं,स्थळं व प्रसंग काल्पनिक आहेत.
आणि कथेमध्ये येणारे अपशब्द हे शिव्या वाटल्या तर तो गैरसमज असेल…त्या “गाळ्या” आहेत.
“अस्सल गोड मालवणी गळ्यातून येणार्या सहज भावना म्हणजे गाळ्या. .!”
कोणालाही दुखावायचा तथा असंस्कृतपणाचा इथे संबंध व प्रयत्न नाही…!)
छान कथानक.