विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या हडी गावात भाजप किसान मोर्चा मालवणच्या माध्यमातून सामुदायिक शेती केली जात आहे. अनेक शेतकरी शेती करण सोडून देत आहेत, जमिनी पडीक होत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीकडे परत वळावे, त्यांच्यात हरित चैतन्य निर्माण व्हावे, त्यांना सामुहिक शेतीची प्रेरणा मिळावी, शेतीची विषयी भावना परत त्यांच्या मनात जागृत व्हावी हा प्रामाणिक प्रयत्न भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा मालवण करत आहे.
त्याचसोबत पर्यटकांनाही शेतावर आणून त्यांना सुद्धा त्याचा आनंद घेता यावा. यातून शेतकऱ्यांचे विना मोबदला काम होईल. त्याचा उत्साह वाढेल आणि त्याच बरोबरच पर्यटकांना पण आपण स्वतः शेती केल्याचा आनंद मिळेल हा या मागचा किसान मोर्चाच्या टीमचा उद्देश आहे.
यावेळी हरी केळुसकर, संजय मळेकर, किशोर नरे, प्रसाद भोजने, विष्णू नरे, घनश्याम मांजरेकर, अंकिता लाड, मंगल हडकर, अल्का साळसकर, वनिता हडकर आदी उपस्थित होते.
तसेच जवळच्या मालवण शहरातील प्राध्यापिका डाॅ. सुमेधा नाईक, उद्योजिका नैना पोयरेकर, अनुष्का गावडे, समाज अभ्यासक स्वाती पारकर, कविता तळेकर व युवा समाजशील व्यक्तिमत्व दर्शन वेंगुर्लेकर हे देखील या शेती आनंदात उत्साहाने सहभागी झाले.