26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

माडी छपरी…फुल्ल अधिकारी…! (मालवणी कथा मालिका) भाग : १

- Advertisement -
- Advertisement -

(या काल्पनीक कथामालेतील सर्व पात्रे,नांवं,स्थळं व प्रसंग काल्पनिक आहेत. कथेमध्ये येणारे अपशब्द हे शिव्या वाटल्या तर तो गैरसमज असेल…त्या बोली भाषेतील “गाळ्या” आहेत. “अस्सल गोड मालवणी गळ्यातून येणार्या सहज भावना म्हणजे गाळ्या. .!” कोणालाही दुखावायचा तथा असंस्कृतपणाचा इथे संबंध व प्रयत्न नाही…!)

(लेखक : सुयोग पंडित.)

“ए रतन्या…..?दर्यात रिपोर्ट काय रे रातचो.?”
इतक्या सकळ मकळ रतन्याच्या घराकडे जावन आरडाओरड घालू शकात असो एकच जीव गावांत जलामलेलो….,
तो म्हणजे रतन्याचो शाप खास माणुस शैलो…!
शैल्या आणि रतन्याची लहानपणापासनाच घसन.
दोघवले एकाच वर्गात आणि एकाच टायमार म्हणजे नववीतना शाळेनं सुको नारळ देऊन बाहेर घालवलेले किलेषी पोरगे…!
दोघांकाय दहावीत ढकलून शाळेची एस.एस.सीच्या शंभर टक्के परंपरेची काशी होऊ नये म्हणून हेडमास्तरांनी घेतलेलो तो एक सामाजिक आणि शैक्षणिक निर्णयच होतो….!

दोघवल्यांची कुंडली जवळपास सारखीच असल्यासारखी…!
शाळा आणि शिक्षण सुटल्याची दोघवल्यांका आजय फिकीर नायच ह्याय मात्र खरा…!
आता दोघवले चाळिशीक पोचलेले….
‘आवशिच्या हट्टापायी शैल्याक लगीन करुचा लागला आणि आवशिच्याच हट्टापायी रतन्यान लगीन करुक नव्हता’,इतकोच काय तो दोघांच्या जीवनातलो फरक..बाकी ते दोगवले अगदी एकमेकांचे जीवन जुवळेच..!

आता शैलो इलो म्हणल्यार रतन्याच्या आवशिचा त्वांड उघाडणा साहजिकच होता म्हणून ती कायतरी बोलाच्या आधीच रतन्यान जोरदार आरडान शैल्याक सांगल्यान, “अरे बंपर बांगडो गावलो रे.. …पण आवझवारो आमच्या बोटीक नाय…!
गोविंदाच्या बोटीक गावलो. …
बघया आज रातच्याक आम्ही वायच उपर जावन बघतंव…नायतर दोनचार दिवसांत वारो पडलो तर न्हयकच जातलंव…
सांगतंय तुका सगळा….
बंड्याशेठच्या शाळेत भेटाया….चल तू इलंय मी…
वायच न्हावन येतंय…!”

एका श्वासात  रतन्यान दोनचार वाक्या मशिनगनीसारखी सोडल्यान म्हणजे रतन्याची आवस आसपासच आसा ह्या वळखान शैल्यान चापकन् त्याची ढेंगा रतन्याच्या परड्याबाहेर नेल्यान…
“बरा बरा….मी जातंय पुढे….तू ये.
तवसर मी बत्ती लावतंय शाळेत…!”
इतक्या बोलान शैल्यानं बोच्याक यामाह इंजन लायल्यासारखी चाल धरुन थयना कल्टी मारल्यान.

“आयेच्या घोवाची शाळा….!”
रतन्याची आवस आता पाठच्या दाराकडना लोट्यार येवन गराजली.
रतनोपण बर्म्युडाची हाफचड्डी चढवन लोट्यार इलो…
सकळमकळ आवशीक चाळावला तर दिसभर नाय नायती लचांडा मागे लागतत ह्या रतन्याक पक्क्या म्हायती होता.
म्हणान वायच खालमानेनं आणि वरमान रतनो बोललो ,” काय गे…जावन देत. .!
माका आरडतं ता ठीक आसा गे आये..
पण शैल्याक नको आरडू आता…!
त्याचा चेडू अकरावीत जाऊक लागला हा आता. ..आणि तेची बायलय पिग्मी गोळा करता गे..
त्यांचो वायच इचार कर…..लाज होता त्यांका तुझ्या आरडीन..!”

रतनो जरी नम्रपणान सगळा बोललो तरी तो जा काय बोललो तो इषय आयकान रतन्याच्या आवशिची सटाकली. ..
आता तिना रतन्याकडे मोर्चो वळयीत म्हणल्यान, ” ए पिचवाला. ..माका शिकयतं. ..कोणाक काय बोलाचा ता?
माझ्या घरात, माझ्या परड्यात रवान बोलतं हय मी…!
तू कालचा क्वाएट माका शिकवतं ह बरो..!
तो अक्करमाशी माझ्या परड्यात येवन तुका बोलवता…
बरा बोलावता तो खय..?तर शाळेत.
अरे हिजड्यांनो, दोघवले घोडे शाळेत जातास म्हणजे खय जातास ….तर बंड्या गांवकराच्या माडी छपरात..!
बरा तो पुढे जावन बत्ती लावतलो ती काय स्वतःच्या घरात नायतर देवळात नायच. …ती बंड्याच्या धंद्यावर लावतलो…!
स्वतःच्या घरात कधी न चुकता  रोजची बत्ती लावतास रे ?
थय बंड्याच्या माडीछपरात,स्वतःच्या पैशातना मसाल्याचे अगरबत्ते नेऊन नेऊन लावतास…!
एखाद्या अनोळख्यान तुमचे ‘शाळा,बत्ती’ हे शब्द ऐकल्यान तर त्याका तुम्ही दोघवले देवमाणुस वाटशात रे…
पण मी तसलीच निसकी आणि खमकी म्हणान तुमचो डेको जयल्याथय ठेचीत आसतंय.
ता काय माका म्हायती नाय. ..परत तो शैलो सकळमकळ हय माझ्या दारार येता नये..
पस्तीस वर्षा झाली आता. …ती पनवती सकाळीच तिचो आवाज ऐकवन जाता आणि माझ्या त्वांडाचा गटार होऊन जाता…!”

रतनो आता आवशिकडे बघून हसाक लागलो.
कारण हो प्रसंग आजचोच नव्हतो तर रोजचोच होतो.
रोज शैल्यान रतन्याक सकाळ मकळ पुकारणा,रतन्याच्या आवशिन शैल्याचो शिमगो घालणा आणि नंतर रतन्यान हसत हसत आवशिची समजूत काढणा ही रोजच घडणारी पण नाय घडली तर चुकचुक देणारी प्रभात परंपराच होती जणू..!

आता हाफचड्डीर ‘बेन टॅनचो’ टी.शर्ट चढवून रतनो लोट्यार घुटमळाक लागलो.
आवशीन रतन्याकडे बघून काय ता वळाखल्यान आणि ती माजघरातल्या कपाटाकडे गेली.
भुतुरना शंभराचे दोन नोटी घेऊन येऊन तिना रतन्याच्या हातिर ठेवले आणि ती म्हणली ,” कसलो लहान पोरग्यांच्या कार्टूनचो टी शर्ट घालून गावभर बागाडतं रे…लाज नाय तुका..?
तुझा वय काय…कपडे कसले…!
आता तो पुतण्याचो टी शर्ट आसा म्हणान हौशेन घरात घालतं ता एकवेळ चलात रे…पण गांवभर ही असली टि शर्टा घालून फिरतं ह….मग लोक खुळगोच म्हणतले हा रतन्या..!”
रतनो आणखी चेकाळत हसलो. ..
त्याच्या थोरल्या भावाच्या थोरल्या झिलाचे जुने कपडे रतनो आवडीन घाली.तो पुतणो आता नोकरेक लागलेलो. ..पण काकार त्याचो खूप जीव.
तो नविन कपडे पाठवीच पण रतनो ते फक्त सणासुदीक घाली आणि एरवी त्याचे वापरलेले कपडे आनंदानं घाली. .
सगळे नविनच वाटतीत अशे कपडे होते मात्र ह्या बाकी खरा…!

रतन्याक चेकाळलेलो बघून आऊस आणखी दरडावत म्हणली,”ह्या बघ…माका म्हायती आसा…आज तुमचो माश्याचो रिपोर्ट पडाक नाय…पण म्हणान थय बंड्याशेठच्या दुकानार उधारी बिधारी नको..!
तो देवमाणुस आसा तसो…
तुमच्यासारख्या शैतानांका बरी वागणूक देता…
मागे तुझी तीन हजार रुपये उधारी झाली तरी त्याना त्वांड उघडून मागुक नव्हती. ..
झिंगीत तूच माका बोलान गेलं म्हणान मी त्याचे पैशे देवक गेलंय तर त्याना घेऊक नव्हते. ..
परत तसले प्रकार नको…आजकाल धंद्यात कोणच श्रीमंत नाय की गरीब नाय. ..सगळ्यांचा रोजचा चलन चलणा महत्वाचा. .!”
आता रतन्याच्या डोळ्यांत पाणी होता.
पण सकाळीच रडान डोळे लाल केले तर माडी छपरातले पोरगे उगीच खेचित रवतले ह्या इचारान त्याना फक्त आवशिचो हात घट धरुन तो आपल्या टकलेक लावल्यान.
चपले घालून तो पायरेरना उतरा होतोच तवसर रतन्याच्या आवशिन एक डबो रतन्याच्या हातीत ठेवल्यान.
“नाष्टो बिष्टो तुम्ही काय करुचासंच नाय.
काल रातचे भाजलेले चार बांगडे आसत. .आणि चार चपाते.
गरम करुन दिलं हय.
उपाशी रवा नको. ….माडी टाकून दमल्यार ह्यातले दोनचार घास खावन घे. ..आणि त्या अक्करमाश्या शैल्याकपण दे…
कळला काय…?
त्याची बायल भायरची आसा. ..ती जेवाण,नाष्टो चार दिवस नाय रांधुची. ..
चेडू कॉलेजातना इला काय मगेच रांधतला. ..
तो पण तवसर भुकोच आसतलो. …त्याकाय खावक सांग.
आणखी जगाक वाटाप करीत रवा नको दोघे….
आणि दुपारी टायमार जेवक ये….मग वायच झोपान सांजच्याक दाजीवांगडा दर्यात जावचा आसा …!”
इतक्या बोलान रतन्याच्या आवशीन खळा साफ करुचो मुगडो हातीत घेतल्यान.

रतन्यानं आवशिकडे खूप मायेन बघल्यान.
आणि तटकी लावता लावता आराडलो, “तुका घेवन येव गे एक बाटली…..गोड्या माडियेची. ..?
तुझ्यासारखीच आसता. ..मधुर….गोड गोड…
पण कधी कधी बेरीवाली गावली तर प्वाट खळखळान खड्डे खणुची पाळी येता..हा…हा..हा..हा..हा..!”

रतन्याच्या आवशीन लटक्या रागान मुगडो हातीत घेवन रतन्याची पाठ धरल्यासारखा केल्यान तसो रतनो अगदी लहान मुलासारखो थयना, “नाय नाय गे…चेष्टा केलंय. .वायच भगल….
नको…नको मुगडो नको फेकून मारु….
चलतंय. …
येतंय गे मम्मी. ..!”म्हणत थयना लांब लांब ढेंगा टाकीत माडी छपराची दिशा धरल्यान .
रतनो लाडात इलो की आवशिक “मम्मी” म्हणान हाक मारी. ..तिकापण ती हाक खूप आवडा.

रतनो घरासमोरना दिसेनासो झाल्यार त्याच्या आवशिन लोट्यारच्या त्याच्या बापशिच्या फोटोक बघून म्हणल्यान,
” सारंगांनू….रत्नच दिलास ओ पदरात. …..तुमच्यासारखोच दुडदुडो आणि तितकोच हळवो…!
चढवतंय. …चढवतंय. .फोटोर हार चढवचो आसा. ..
माका म्हायती आसा….!
तुमका गावठी गुलाबाचोच हार आवाडता. ..कारण माका गुलाब आवाडता…!”

रतन्याची आवस हलकेच लाजानपण गेली आणि आवशिच्या डोळ्यांतना दवासारखे चार अश्रूपण ओघाळले…!

**************
( पुढील भाग येत्या रविवारी दिनांक :३ जुलै )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

(या काल्पनीक कथामालेतील सर्व पात्रे,नांवं,स्थळं व प्रसंग काल्पनिक आहेत. कथेमध्ये येणारे अपशब्द हे शिव्या वाटल्या तर तो गैरसमज असेल...त्या बोली भाषेतील "गाळ्या" आहेत. "अस्सल गोड मालवणी गळ्यातून येणार्या सहज भावना म्हणजे गाळ्या. .!" कोणालाही दुखावायचा तथा असंस्कृतपणाचा इथे संबंध व प्रयत्न नाही...!)

(लेखक : सुयोग पंडित.)

"ए रतन्या.....?दर्यात रिपोर्ट काय रे रातचो.?"
इतक्या सकळ मकळ रतन्याच्या घराकडे जावन आरडाओरड घालू शकात असो एकच जीव गावांत जलामलेलो....,
तो म्हणजे रतन्याचो शाप खास माणुस शैलो...!
शैल्या आणि रतन्याची लहानपणापासनाच घसन.
दोघवले एकाच वर्गात आणि एकाच टायमार म्हणजे नववीतना शाळेनं सुको नारळ देऊन बाहेर घालवलेले किलेषी पोरगे...!
दोघांकाय दहावीत ढकलून शाळेची एस.एस.सीच्या शंभर टक्के परंपरेची काशी होऊ नये म्हणून हेडमास्तरांनी घेतलेलो तो एक सामाजिक आणि शैक्षणिक निर्णयच होतो....!

दोघवल्यांची कुंडली जवळपास सारखीच असल्यासारखी...!
शाळा आणि शिक्षण सुटल्याची दोघवल्यांका आजय फिकीर नायच ह्याय मात्र खरा...!
आता दोघवले चाळिशीक पोचलेले....
'आवशिच्या हट्टापायी शैल्याक लगीन करुचा लागला आणि आवशिच्याच हट्टापायी रतन्यान लगीन करुक नव्हता',इतकोच काय तो दोघांच्या जीवनातलो फरक..बाकी ते दोगवले अगदी एकमेकांचे जीवन जुवळेच..!

आता शैलो इलो म्हणल्यार रतन्याच्या आवशिचा त्वांड उघाडणा साहजिकच होता म्हणून ती कायतरी बोलाच्या आधीच रतन्यान जोरदार आरडान शैल्याक सांगल्यान, "अरे बंपर बांगडो गावलो रे.. ...पण आवझवारो आमच्या बोटीक नाय...!
गोविंदाच्या बोटीक गावलो. ...
बघया आज रातच्याक आम्ही वायच उपर जावन बघतंव...नायतर दोनचार दिवसांत वारो पडलो तर न्हयकच जातलंव...
सांगतंय तुका सगळा....
बंड्याशेठच्या शाळेत भेटाया....चल तू इलंय मी...
वायच न्हावन येतंय...!"

एका श्वासात  रतन्यान दोनचार वाक्या मशिनगनीसारखी सोडल्यान म्हणजे रतन्याची आवस आसपासच आसा ह्या वळखान शैल्यान चापकन् त्याची ढेंगा रतन्याच्या परड्याबाहेर नेल्यान...
"बरा बरा....मी जातंय पुढे....तू ये.
तवसर मी बत्ती लावतंय शाळेत...!"
इतक्या बोलान शैल्यानं बोच्याक यामाह इंजन लायल्यासारखी चाल धरुन थयना कल्टी मारल्यान.

"आयेच्या घोवाची शाळा....!"
रतन्याची आवस आता पाठच्या दाराकडना लोट्यार येवन गराजली.
रतनोपण बर्म्युडाची हाफचड्डी चढवन लोट्यार इलो...
सकळमकळ आवशीक चाळावला तर दिसभर नाय नायती लचांडा मागे लागतत ह्या रतन्याक पक्क्या म्हायती होता.
म्हणान वायच खालमानेनं आणि वरमान रतनो बोललो ," काय गे...जावन देत. .!
माका आरडतं ता ठीक आसा गे आये..
पण शैल्याक नको आरडू आता...!
त्याचा चेडू अकरावीत जाऊक लागला हा आता. ..आणि तेची बायलय पिग्मी गोळा करता गे..
त्यांचो वायच इचार कर.....लाज होता त्यांका तुझ्या आरडीन..!"

रतनो जरी नम्रपणान सगळा बोललो तरी तो जा काय बोललो तो इषय आयकान रतन्याच्या आवशिची सटाकली. ..
आता तिना रतन्याकडे मोर्चो वळयीत म्हणल्यान, " ए पिचवाला. ..माका शिकयतं. ..कोणाक काय बोलाचा ता?
माझ्या घरात, माझ्या परड्यात रवान बोलतं हय मी...!
तू कालचा क्वाएट माका शिकवतं ह बरो..!
तो अक्करमाशी माझ्या परड्यात येवन तुका बोलवता...
बरा बोलावता तो खय..?तर शाळेत.
अरे हिजड्यांनो, दोघवले घोडे शाळेत जातास म्हणजे खय जातास ....तर बंड्या गांवकराच्या माडी छपरात..!
बरा तो पुढे जावन बत्ती लावतलो ती काय स्वतःच्या घरात नायतर देवळात नायच. ...ती बंड्याच्या धंद्यावर लावतलो...!
स्वतःच्या घरात कधी न चुकता  रोजची बत्ती लावतास रे ?
थय बंड्याच्या माडीछपरात,स्वतःच्या पैशातना मसाल्याचे अगरबत्ते नेऊन नेऊन लावतास...!
एखाद्या अनोळख्यान तुमचे 'शाळा,बत्ती' हे शब्द ऐकल्यान तर त्याका तुम्ही दोघवले देवमाणुस वाटशात रे...
पण मी तसलीच निसकी आणि खमकी म्हणान तुमचो डेको जयल्याथय ठेचीत आसतंय.
ता काय माका म्हायती नाय. ..परत तो शैलो सकळमकळ हय माझ्या दारार येता नये..
पस्तीस वर्षा झाली आता. ...ती पनवती सकाळीच तिचो आवाज ऐकवन जाता आणि माझ्या त्वांडाचा गटार होऊन जाता...!"

रतनो आता आवशिकडे बघून हसाक लागलो.
कारण हो प्रसंग आजचोच नव्हतो तर रोजचोच होतो.
रोज शैल्यान रतन्याक सकाळ मकळ पुकारणा,रतन्याच्या आवशिन शैल्याचो शिमगो घालणा आणि नंतर रतन्यान हसत हसत आवशिची समजूत काढणा ही रोजच घडणारी पण नाय घडली तर चुकचुक देणारी प्रभात परंपराच होती जणू..!

आता हाफचड्डीर 'बेन टॅनचो' टी.शर्ट चढवून रतनो लोट्यार घुटमळाक लागलो.
आवशीन रतन्याकडे बघून काय ता वळाखल्यान आणि ती माजघरातल्या कपाटाकडे गेली.
भुतुरना शंभराचे दोन नोटी घेऊन येऊन तिना रतन्याच्या हातिर ठेवले आणि ती म्हणली ," कसलो लहान पोरग्यांच्या कार्टूनचो टी शर्ट घालून गावभर बागाडतं रे...लाज नाय तुका..?
तुझा वय काय...कपडे कसले...!
आता तो पुतण्याचो टी शर्ट आसा म्हणान हौशेन घरात घालतं ता एकवेळ चलात रे...पण गांवभर ही असली टि शर्टा घालून फिरतं ह....मग लोक खुळगोच म्हणतले हा रतन्या..!"
रतनो आणखी चेकाळत हसलो. ..
त्याच्या थोरल्या भावाच्या थोरल्या झिलाचे जुने कपडे रतनो आवडीन घाली.तो पुतणो आता नोकरेक लागलेलो. ..पण काकार त्याचो खूप जीव.
तो नविन कपडे पाठवीच पण रतनो ते फक्त सणासुदीक घाली आणि एरवी त्याचे वापरलेले कपडे आनंदानं घाली. .
सगळे नविनच वाटतीत अशे कपडे होते मात्र ह्या बाकी खरा...!

रतन्याक चेकाळलेलो बघून आऊस आणखी दरडावत म्हणली,"ह्या बघ...माका म्हायती आसा...आज तुमचो माश्याचो रिपोर्ट पडाक नाय...पण म्हणान थय बंड्याशेठच्या दुकानार उधारी बिधारी नको..!
तो देवमाणुस आसा तसो...
तुमच्यासारख्या शैतानांका बरी वागणूक देता...
मागे तुझी तीन हजार रुपये उधारी झाली तरी त्याना त्वांड उघडून मागुक नव्हती. ..
झिंगीत तूच माका बोलान गेलं म्हणान मी त्याचे पैशे देवक गेलंय तर त्याना घेऊक नव्हते. ..
परत तसले प्रकार नको...आजकाल धंद्यात कोणच श्रीमंत नाय की गरीब नाय. ..सगळ्यांचा रोजचा चलन चलणा महत्वाचा. .!"
आता रतन्याच्या डोळ्यांत पाणी होता.
पण सकाळीच रडान डोळे लाल केले तर माडी छपरातले पोरगे उगीच खेचित रवतले ह्या इचारान त्याना फक्त आवशिचो हात घट धरुन तो आपल्या टकलेक लावल्यान.
चपले घालून तो पायरेरना उतरा होतोच तवसर रतन्याच्या आवशिन एक डबो रतन्याच्या हातीत ठेवल्यान.
"नाष्टो बिष्टो तुम्ही काय करुचासंच नाय.
काल रातचे भाजलेले चार बांगडे आसत. .आणि चार चपाते.
गरम करुन दिलं हय.
उपाशी रवा नको. ....माडी टाकून दमल्यार ह्यातले दोनचार घास खावन घे. ..आणि त्या अक्करमाश्या शैल्याकपण दे...
कळला काय...?
त्याची बायल भायरची आसा. ..ती जेवाण,नाष्टो चार दिवस नाय रांधुची. ..
चेडू कॉलेजातना इला काय मगेच रांधतला. ..
तो पण तवसर भुकोच आसतलो. ...त्याकाय खावक सांग.
आणखी जगाक वाटाप करीत रवा नको दोघे....
आणि दुपारी टायमार जेवक ये....मग वायच झोपान सांजच्याक दाजीवांगडा दर्यात जावचा आसा ...!"
इतक्या बोलान रतन्याच्या आवशीन खळा साफ करुचो मुगडो हातीत घेतल्यान.

रतन्यानं आवशिकडे खूप मायेन बघल्यान.
आणि तटकी लावता लावता आराडलो, "तुका घेवन येव गे एक बाटली.....गोड्या माडियेची. ..?
तुझ्यासारखीच आसता. ..मधुर....गोड गोड...
पण कधी कधी बेरीवाली गावली तर प्वाट खळखळान खड्डे खणुची पाळी येता..हा...हा..हा..हा..हा..!"

रतन्याच्या आवशीन लटक्या रागान मुगडो हातीत घेवन रतन्याची पाठ धरल्यासारखा केल्यान तसो रतनो अगदी लहान मुलासारखो थयना, "नाय नाय गे...चेष्टा केलंय. .वायच भगल....
नको...नको मुगडो नको फेकून मारु....
चलतंय. ...
येतंय गे मम्मी. ..!"म्हणत थयना लांब लांब ढेंगा टाकीत माडी छपराची दिशा धरल्यान .
रतनो लाडात इलो की आवशिक "मम्मी" म्हणान हाक मारी. ..तिकापण ती हाक खूप आवडा.

रतनो घरासमोरना दिसेनासो झाल्यार त्याच्या आवशिन लोट्यारच्या त्याच्या बापशिच्या फोटोक बघून म्हणल्यान,
" सारंगांनू....रत्नच दिलास ओ पदरात. .....तुमच्यासारखोच दुडदुडो आणि तितकोच हळवो...!
चढवतंय. ...चढवतंय. .फोटोर हार चढवचो आसा. ..
माका म्हायती आसा....!
तुमका गावठी गुलाबाचोच हार आवाडता. ..कारण माका गुलाब आवाडता...!"

रतन्याची आवस हलकेच लाजानपण गेली आणि आवशिच्या डोळ्यांतना दवासारखे चार अश्रूपण ओघाळले...!

**************
( पुढील भाग येत्या रविवारी दिनांक :३ जुलै )

error: Content is protected !!