मसुरे | प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनी मौजे गुरामवाडी येथे “शेतकरी दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आला. कृषि सहाय्यक पवनकुमार सौंगडे यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी मंगल ऑरगॅनिक्सचे जिल्हा समन्वयक श्री प्रताप सलगर यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व व सेंद्रिय शेती प्रमाणीकरण याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री व्ही.के.जाधव यांनी गांडूळ खत युनिट बांधणी व गांडूळ खतांचा सुयोग्य वापर यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले तर, माजी बांधकाम व वित्त सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य श्री संतोष साटविलकर यांनी मनोगत व्यक्त करताना कृषि विभागाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवण तालुका कृषि अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी, उपसरपंच श्री मकरंद सावंत, ग्रामपंचायत सदस्य श्रीम. रुपाली परुळेकर, कृषि पर्यवेक्षक श्री सिताराम परब, कृषि पर्यवेक्षक श्री धनंजय गावडे, पंचायत समिती मालवणचे विस्तार अधिकारी श्री व्ही. के. जाधव, श्री के. टी. पाताडे, कृषि सहाय्यक श्री मिलिंद कदम, श्री आनंद धुरी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी, ग्रामसेवक श्री सरमळकर आदी उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन कृषि सहाय्यक श्री पवनकुमार सौंगडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता श्री शेखर कुडाळकर, श्री विजय गोठणकर, श्री विराज गोठणकर व श्रीम. शमिका कुडाळकर यांनी सहकार्य केले.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -