बांदा | राकेश परब :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन आणि पराक्रमाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे कार्य हे आताच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांचे आचार, विचार यांचे अनुसरण करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन नट वाचनालयचे उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी येथे केले.
येथील बांदेश्वर सेवा सुविधा केंद्र व नट वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्री मोर्ये बोलत होते. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह राकेश केसरकर, संचालक निलेश मोरजकर, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर -नाईक, बांदेश्वर सेवा सुविधा केंद्राचे संचालक प्रशांत गवस, भूषण सावंत, केदार कणबर्गी, अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, नारायण बांदेकर, व्यवस्थापक दिक्षा गवस आदी उपस्थित होते. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण सावंत यांनी केले.