27 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

‘गाळ उपसा’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ‘वाळू उपसा’ केला जातोय : विलवडे मनसे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत यांचा गंभीर आरोप..!!

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब :
विलवडे गावांमध्ये आसपास शंभरच्यावर घरामध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी घुसल्याने अतोनात नुकसान झालं.या पाश्र्वभूमीनुसार शासनाने गाळ काढण्याचे काम ठेकेदाराला दिले असून ज्या ठिकाणाहून पाणी गावामध्ये शिरले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ असून त्या ठिकाणचा गाळ उपसा केला जात नाही.परंतु या गाळाच्या निमित्ताने वाळू मात्र मोठ्या प्रमाणात काढली गेली असा आरोप मनसेचे विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत यांनी केला आहे. पुरहानी मध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे,घरांचं नुकसान झाले अजून नुकसान भरपाई काही जणांना मिळाली नाही परंतु गाळ काढण्याचा जो प्रकार सुरू आहे हा कुठेतरी स्वतःच्या फायद्यासाठी होत आहे. असा आरोप श्रीराम सावंत यांनी केला आहे. त्यामुळे गाळ उपसा करण्यासाठी ही समिती नेमली गेली ती कुठेही या ठिकाणी फिरताना आढळत नाही.
या ठिकाणी गाळ काढण्यासाठी जो ठेकेदार नेमला आहे ते फक्त वाळु आणि नदीतील दगड काढण्यात व्यस्त आहेत. जर पुन्हा विलवडे मळवाडी पाणी घुसले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधीत विभागाची असेल कारण आम्ही वारंवार सांगूनही नको त्या ठिकाणचा गाळ काढला जातो असा आरोप विलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत यांनी केला आहे.
यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे असे हवामान खाते सांगत असून धीम्या गतीने गाळ उपसा काढण्याचे काम चालू आहे . एकदा काय पाऊस पडला की त्या ठिकाणी असणाऱ्या मशिनरी ठेकेदार उचलणार आज या ठिकाणी अंदाजे पंधरा ते सोळा हजार डंपर गाळ काढला गेला आणि यातून वाळूचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं तसेच गाळातून जे दगड काढले गेले ते शासनाची परवानगी न घेता परस्पर नॅशनल हायवेवर साईडला ठिकाणी टाकण्यात आले जर या सर्व घटनेची चौकशी झाली नाही तसेच येत्या चार दिवसात जागा काढला गेला नाही आणि जनतेला मात्र यावर्षीही पुराचा सामना करावा लागला तर आम्ही आमची मुलं-बाळं घेऊन तहसीलदार कार्यालयात राहणार आहोत असा इशाराही मनसेचे विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!