ज्येष्ठ वृत्तनिवेदक श्री. प्रदिप भिडे काळाच्या पडद्याआड..!!
मुंबई | ब्यूरो न्यूज:
पत्रकारिता क्षेत्रातील एक मोठं नाव अर्थात ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदिप भिडे (Pradeep Bhide). यांचं आज वयाच्या ६४व्या वर्षी निधन झालं.
पत्रकारितेच्या ‘निवेदन’ या क्षेत्रातील एक बुलंद तरीही सभ्य व भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले प्रदीप भिडे हे एक ज्येष्ठ वृत्तनिवेदक होते.
कोणताही अंगविक्षेप नाही, कोणताही आक्रस्ताळेपणा नाही. केवळ आवाज व बातम्या सांगण्याची विशिष्ट शैली यांमूळे त्यांनी आज प्रत्येक कुटूंबातल्या व्यक्तिच्या मनात मानाचे स्थान पटकावले होते.
त्यांच्या भारदस्त आवाजासाठी आणि वृत्तनिवेदनाच्या विलक्षण पद्धतीसाठी ते ओळखले जात होते.
आज त्यांच्या निधनाच्या बातमीने पत्रकारिता क्षेत्रात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.
दूरदर्शवरील (Doordarshan) खणखणीत आणि बुलंद आवाज हरपल्याची खंत प्रत्येकजण व्यक्त करताना दिसत आहे. दूरदर्शनचा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा पैलू निखळला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
ज्या काळात डिजिटल साधन सोडा साधी 24 तास बातम्या सांगणारी वाहिनी उपलब्ध नव्हती तेव्हा प्रदीप भिडे यांनी दूरदर्शनवर बातम्या व्यवस्थित पद्धतीने पोहोचवण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती.
त्यांच्या पत्रकारीतेच्या क्षेत्रातील कार्याला व त्यांच्या पवित्र स्मृतींना ‘आपली सिंधुनगरी चॅनेल’ विनम्रतापूर्वक ‘वंदन’ करीत आहे.
..भावपूर्ण श्रद्धांजली..!!