26.7 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

तारकर्ली येथे ‘सुसज्ज मच्छी विक्री मार्केट’ व्हावे : सामाजिक कार्यकर्ते श्री. बापर्डेकर यांची मागणी..!!

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील निसर्गरम्य तारकर्ली गावात तारकर्ली मच्छी विक्री मार्केट बांधावे अशी मागणी तारकर्लीचा सामाजिक कार्यकर्ता श्री.सुरेश बापर्डेकर यांनी नुकतेच मा.सहाय्यक आयुक्त सिंधुदुर्ग मालवण यांना निवेदन देऊन केली आहे.तारकर्ली येथील ग्रामस्थ मच्छीमार मच्छी विक्री करणाऱ्या महिला यांच्या समस्या वारंवार भेडसावत आहेत ते निवेदनाद्वारे मांडले आहे.त्याचे शक्यतीतक्या लवकर कार्यवाही व्हावी असे श्री. बापर्डेकर यांनी पत्रकात म्हंटले आहे.
श्री. बापर्डेकर यांनी पत्रकात म्हटल आहे की,तारकर्ली येथे मच्छी विक्री करण्याकरीता महिला वर्ग मोठ्या प्रमाणात असून त्या सर्व महिला तारकर्ली वाहतुकीच्या रोडवर उन्हा पावसात मासे विक्री करण्याकरिता रस्त्यावर बसतात उन्हा पावसात त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.अशावेळी ये जा करणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी वाहतुकीची कोंडी होत असताना त्यांना बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते.त्यात लाईंन मध्ये सुस्थितीत बसुन मासे विक्री करण्यास बसता येत नाहीं आणि माशांचे पाणी रस्त्यावर कित्येकवेळा पडण्याचा संभव असतो.यामुळे परीसरात अस्वच्छता पसरते. तारकर्ली येथे मत्स्य लिलाव गृह शासनाकडून निधी प्राप्त झाला असता तारकर्ली बंदर येथे ते का बांधन्यात येत नाही.जी बांधकाम करायची जागा आहे ती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांची असून मा.सहाय्यक आयुक्त सिंधुदुर्ग ,मालवण यांनी लवकरात लवकर बांधून घेणे. जेणकरून तारकर्लीच्या मच्छि विक्री करणाऱ्या महिलांना होणारा त्रास आणि त्यांची गैरसोय सद्या होत आहे. त्यापासून त्या मुक्त होतील. सद्या मासळीचे प्रमाण बरेच घटले असून त्या बांधकाम केलेल्या जागेचा उपभोग मच्छी विक्री करणाऱ्या महिला वर्ग घेतील.त्याठिकाणी मासे विक्री करणाऱ्या महिला त्यानिवांत सावलीत बसून मच्छी विक्री करतील.त्यामुळे त्या बांधकामाला तारकर्ली मच्छी विक्री मार्केट अशा प्रकारे नाव देऊन त्याचे बांधकाम गाळ्या प्रमाणे बांधून पाणी निघून जाईल अशाप्रकारे त्याचे बांधकाम करणे. मार्केट नेहमी स्वच्छ राहील.
तसेच श्री. बापर्डेकर यांनी असे सूचित केले की,मच्छी मार्केट सुशोभित बांधकाम झाले तर तारकर्ली येथील ग्रामस्थ मच्छीमार महिला चांगल्या जागेत चांगल्या ठिकाणी सुरक्षित सुस्थितीत बसुन मासे विक्री करतील.हा तारकर्ली गाव पर्यटन दुष्ट्या विकसित असल्याने तारकर्ली गावाची यामुळे शान वाढावी यासाठी आपण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मच्छी विक्री करणाऱ्या महिलांना फायदा होईल.असे मां.सहाय्यक आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तरी तारकर्ली मच्छी विक्री मार्केट बांधून त्याला नाव द्यावे अशा मागणीचा लवकरात लवकर विचार करून त्वरित कार्यवाही करण्यात यावे.असे सुरेश प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेवटी केली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!