शिरगांव | संतोष साळसकर : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत देवगड तालुक्यातील केंद्रशाळा साळशी नं.१ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
या प्रशालेतील विराज सुनील कोदले (इ.३री)याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
आर्या निलेश गांवकर (इ.४थी) हिने जिल्ह्यात तिसरा क्रमांक तर कौस्तुभ कैलास गावकर (इ.३री) याने देवगड तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.
या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्रमुख्याध्यापक गंगाधर कदम,पदवीधर शिक्षक संतोष मराठे, उपशिक्षिका श्रीमती हेमलता जाधव,वर्गशिक्षिका श्रीमती स्मिता कोदले,यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले.गेली ३ वर्षे या साळशी केंद्रशाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत सातत्याने घवघवीत यश संपादन करीत आहेत.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा साळशी सरपंच वैभव साळसकर,उपसरपंच अनंत नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, माजी पं. स. सदस्य सुनील गावकर,केंद्रप्रमुख सौ. वर्षा लाड तसेच पालक,ग्रामस्थ वर्गातून विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.