चिंदर | विवेक परब : भाजप शिष्टमंडळाने चर्चेसाठी मुख्याधिकारी यांची वेळ मागितली असताना सुद्धा चर्चेला वेळ न दिल्याने गनिमी काव्याने भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी दालनात धडक दिली व घेराव घातला.
वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाल्यापासून प्रशासन व कर्मचारी यांचा ताळमेळ नसल्याने वेंगुर्ले शहरातील झालेल्या विकासकामांवर दुर्लक्ष होताना दिसत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत संपुर्ण देशात एक नंबर असलेल्या नगरपरिषदेची अवस्था अस्वच्छतेकडे जाताना दिसत आहे. तीन महिन्यातील प्रशासकीय कारभारामुळे वेंगुर्ले शहराचा विकास खुंटला आहे तसेच समस्यांचे डोंगर तयार झाले आहेत.
क्राॅफर्ट मार्केट व सागररत्न मस्त्य बाजारपेठ मध्ये घाणीचे साम्राज्य, स्वच्छ भारत पर्यटन स्थळाची लागलेली वाट, कॅम्प स्टेडीयम मधील क्रिकेट पीच ची परीस्थिती, सागर हाॅलीडे रीसोर्ट ची दुरावस्था, मानसीश्वर उद्यानाची झालेली दुरावस्था, नगरपरिषद टाॅवर वरील बंद पडलेले घड्याळ, सार्वजनिक टाॅयलेटची दुरावस्था व नीट साफसफाई नसणे, अग्नीशामक केंद्रावरील उडुन गेलेले पत्रे, वाॅटर एटीएमची झालेली दुरावस्था, दाभोली नाका ते निमुसगा रस्त्यावर झालेले डंपींग ग्राउंड, भटवाडी डाॅन्टस काॅलनी ते किनळेवाडी रस्ता डांबरीकरणाचे रखडलेले काम, घोडेबाव गार्डन मधील वेळोवेळी बंद असलेला कारंजा, नातु व्हाळी वरील सांडपाणी प्रक्रिया युनीटचे रखडलेले काम, कलादालन व सभागृह मधील अस्वच्छता, मच्छीमार्केट मधील कोलस्टोरेज बंद स्थीतीत, मच्छीमार्केट व व्यापारी संकुल मधील फायर सिस्टीम बंदस्थीतीत, आनंदवाडी मधील गटारामध्ये घाणीचे साम्राज्य , वेंगुर्लेकर वाडीतील फुटलेली पाण्याची टाकी असे जवळपास ५४ मुद्द्यावर चर्चा करुन मुख्याधिकारी यांना भंडाऊन सोडले.
यावेळी मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे यांनी प्रत्येक प्रश्नावर चर्चा करुन त्या त्या विभागाच्या प्रमुखांना बोलवून येत्या सात दिवसात सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिले, तसेच भाजपा शिष्टमंडळास येत्या आठ दिवसात जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लागतील असे अभिवचन दिले. तसेच प्रशासकीय कारभार सुधारेल अशी ग्वाही दिली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष राजन गीरप, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, जिल्हा उपाध्यक्ष अँड सुषमा खानोलकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, जिल्हा का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, माजी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, माजी नगरसेवक प्रशांत आपटे व धर्मराज कांबळी, माजी नगरसेविका श्रेया मयेकर व साक्षी पेडणेकर, ता.चिटणीस समीर चिंदरकर, युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर – रसीका मठकर – आकांक्षा परब, अल्पसंख्याक सेलचे रफीक शेख, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, बुथप्रमुख शेखर काणेकर, शैलेश मयेकर इत्यादी भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.