डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीअन श्री. गौरीश धोंड , असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ , रोटरी क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर, सेक्रेटरी रतन पांगे व रोटरी क्लब ऑफ मालवणचे रोटरिअन्स यांच्या उपस्थितीतील विशेष सोहळा…
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘रोटरी क्लब ऑफ मालवणच्या’ वतीने एका अभिनव उपक्रमांतर्गत मालवण तालुक्यातील शैक्षणिक, कला , सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना ” नेशन बिल्डर ॲवॉर्ड ” देउन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये काळसे गावचे सुपुत्र तथा प्राथमिक कन्याशाळा मालवणचे शिक्षक आणि कवी , लेखक, तबला वादक , नाट्यकलाकार अशा सर्वांगीण प्रतिभेचे धनी श्री. सुधीर गोसावी यांचा मान्यवरांच्या हस्ते आणि रोटरी क्लब ऑफ मालवणच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मानपत्र आणि शाल श्रीफळ देउन गौरवण्यात आले.
यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन श्री. गौरीश धोंड , असिस्टंट गव्हर्नर रोटरीयन श्री. राजेश घाटवळ , रोटरी क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष रोटरीयन उमेश सांगोडकर, सेक्रेटरी रोटरीयन श्री. रतन पांगे , तसेच रोटरीयन डॉ. अजित लिमये, डॉ. सौ. लिना लिमये , अभय कदम, सुहास ओरसकर , श्री. भाऊ साळगांवकर , श्री. महादेव पाटकर, श्री. उल्हास मसुरकर, श्री. प्रदिप जोशी, श्री. हेमेंद्र पायेकर , श्री. अभय कवटकर , श्री. पवार , श्री. काळसेकर, हेमेंद्र गोवेकर, अनिल चव्हाण , चाचा हडकर, रंजन तांबे आदि मान्यवर आणि रोटरीयन उपस्थित होते.
श्री. सुधीर गोसावी यांच्या सोबतच या पुरस्कार सोहळ्यात मालवणातील सौ. रोहिणी देशमुख, सौ. ज्योती बुवा, सौ. सोनल कदम, सौ श्वेता यादव , श्री शिवराज सावंत, श्री रेनॉल्ड बुतेलो , श्री शंकर खोबरे,श्री. निशिकांत पराडकर , सौ. स्मिता वायंगणकर, श्री डी. डी. जाधव , या शिक्षक शिक्षिकांना पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.