चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांनी काळसे गोसावीवाडी वासियांना विकासकामांबद्दल दिलेला शब्द पाळून श्री सिध्दमहापुरुष मंदिर नजीक संरक्षक भिंत बांधण्यासाठी आमदार फंडातून तब्बल ६ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा आज शुक्रवार दिनांक १५ एप्रिल रोजी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी, माजी जि.प.सदस्य नागेंद्र परब, माजी जी.प.अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना विभागप्रमुख अण्णा गुराम, उमेश प्रभु, सुनील सावंत, बाळ महाभोज, यशवंत भोजने, बाबू टेंबुलकर, गोरखनाथ गोसावी, श्री सिध्दमहापुरुष उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष महेश गोसावी,
राजेंद्र गोसावी , आनंद गोसावी , प्रभाकर गोसावी , मंगेश गोसावी , रामचंद्र गोसावी , संजय गोसावी , विजय गोसावी , सहदेव गोसावी, शशांक गोसावी, किरण गोसावी, प्रथमेश आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी निवृत्त तहसीलदार शरद गोसावी यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला आणि इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी या भागातील विकासकामे पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही निश्चितपणे पूर्ण करू असे मत आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.