27.9 C
Mālvan
Thursday, December 5, 2024
IMG-20240531-WA0007

कला शिक्षक समीर चांदरकर यांचे अनोखे बोधीसत्व वंदन..!

- Advertisement -
- Advertisement -

चौके | अमोल गोसावी : भारतरत्न महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वराडकर हायस्कुल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी पिंपळाच्या पानात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कोरुन महामानवाला अनोखे अभिवादन केले आहे.

बौद्ध धर्मामध्ये बोधी (पिंपळ) वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच बोधीवृक्षाखाली गौतम बुद्धाना ज्ञान प्राप्ती झाली. त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही मानवजातीच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून गौतम बुद्धांची हिच शिकवण समस्त जगाला दिली. त्यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय या मूल्यांवरच संविधानाचा पाया रचला गेला ,
पिंपळाच्या पानात कोरलेल्या चित्राच्या माध्यमातुन नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सहज आणि अप्रतिम कलाकृती साकारता येते हा संदेश विद्यार्थीवर्गाला दिला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

चौके | अमोल गोसावी : भारतरत्न महानायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वराडकर हायस्कुल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी पिंपळाच्या पानात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र कोरुन महामानवाला अनोखे अभिवादन केले आहे.

बौद्ध धर्मामध्ये बोधी (पिंपळ) वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच बोधीवृक्षाखाली गौतम बुद्धाना ज्ञान प्राप्ती झाली. त्यांनी दिलेला मानवतेचा संदेश आजही मानवजातीच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून गौतम बुद्धांची हिच शिकवण समस्त जगाला दिली. त्यांनी दिलेले स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय या मूल्यांवरच संविधानाचा पाया रचला गेला ,
पिंपळाच्या पानात कोरलेल्या चित्राच्या माध्यमातुन नैसर्गिक वस्तूंचा वापर करून सहज आणि अप्रतिम कलाकृती साकारता येते हा संदेश विद्यार्थीवर्गाला दिला आहे.

error: Content is protected !!