चिंदर भगवंतगड शाळेतील विद्यार्थिनी.
चिंदर | विवेक परब : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवण या शिक्षक संघटने मार्फत मुलांच्या बुध्दीमत्तेला चालना देण्यासाठी व मुलांच्या मनातील स्पर्धा परिक्षेची भिती कमी होऊन मुलांच्या विकासाला चालना देण्यासाठी तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
या शिष्यवृत्ती सराव परिक्षेमध्ये जि.प. प्राथमिक शाळा चिंदर भगवंतगड या शाळेची विद्यार्थीनी कु. किंजल आनंद परब हिने मसुरे विभागामधून प्रथम क्रमांक पटकाविला.
१२ एप्रिलला झालेल्या संघटनेच्या तालुकास्तरीय वार्षिक मेळावा व गुणगौरव समारंभा मध्ये कु. किंजल आनंद परब हिला संघनेचे राज्य संघटक श्री. प्रशांत पारकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर संघटनेचेत जिल्हाध्यक्ष, सचिव, यांच्या सहगट शिक्षण अधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.त
सदर विद्यार्थ्यांनीला शाळेच्या मुख्खाध्यापिका सौ. सायली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले किंजल हिचे शाळेतील पधवीधर शिक्षक राजेंद्र गाड तसेच उपशिक्षक सुनिल गोडगे व ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे.