चौके | अमोल गोसावी : ” राम जन्मला ग सखे राम जन्मला” आणि “रघुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम ” अशा नामघोषात काळसे येथील श्री राम मंदिरात रामजन्मोत्सव सोहळा अनेक भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
काळसे सुतारवाडी येथे आजगांवकर कुटुंबीयांनी उभारलेले राम मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी प्रमाणे मानकरी आजगावकर कुटुंबीय आणि गावातील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्त सकाळी प्रभुरामचंद्रांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर पुरोहित श्री. वझे यांनी बारा वाजेपर्यंत श्री रामजन्म कथा कीर्तन सेवा सादर केली. १२ वाजता रामजन्मोत्सव सोहळा व त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात श्रींची पालखी प्रदक्षिणा राममंदिराभोवती काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.