बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली येथे गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पो चा अपघात झाला. टेम्पोचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर चालकाने पलायन केले.दरम्यान इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने या गाडीच्या हौद्यातून ७ लाख ६२ हजार ३०० रुपयांची विविध ब्रँडची दारू मिळून एकूण ९लाख ६२हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली. हा अपघात रविवारी सकाळी घडला.
उत्पादन शुल्क विभाग इन्सुली विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार , इन्सुलीच्या दिशेने आलेले व रस्त्यालगतच्या डाव्या बाजूस असलेल्या मोठ्या झाडाला धडकून चारचाकी अपघातग्रस्त वाहनाजवळ जावून पाहणी केली असता वाहनातून इमारत बांधकामासाठी वापरलेल्या जुन्या प्लायवूड फळयाच्याखाली लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध बँन्डच्या बॉक्समध्ये १८०मि.ली.च्या ४५७८ बाटल्या मिळून आल्या तसेच , वाहनास अपघात झाल्याने हौदयामधील काही दारुच्या बाटल्या फुटून बॉक्स तुटल्याचे दिसले. जप्त केलेला मद्यसाठा हा गोवा बनावटीचा होता. नुकसान झाल्याचे व काच फुटल्याचे दिसून आले. वाहनाचा चालक व प्रकारचे कागदपत्र मिळून आलेली नाही. पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन दारुबंदी कायदयांतर्गत अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. दारु ७लाख ६२ हजार ३०० रुपायांची असून वाहनासह मुद्येमाल एकूण किंमत ९लाख ६२हजार ३०० एवढी आहे. सदरची कारवाई डॉ . बी .
एच . तडवी अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक एस.पी.मोहिते यांनी केली. या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, पी.एस.रास्कर , सहाय्यक दु .निरक्षक गोपाळ राणे , तसेच , राज्य उत्पादन शुल्क कुडाळ विभागाचे निरीक्षक ,अमित पाडळकर , दुय्यम निरीक्षक जगताप, जवान शरद साळुंखे यांनी सहभाग घेतला. या गुन्हयाचा अधिक तपास निरीक्षक एस.पी. मोहिते करीत आहेत.