कणकवलीत महिला दशावताराची रंगीत तालीम संपन्न…!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्टपैलू बाॅलीवुड अभिनेत्री सिंधुरत्न फाऊंडेशन अध्यक्षा सौ. अक्षता कांबळी प्रस्तुत महिला दशावतार नाट्यप्रयोगाची रंगीत तालिम शनिवार दिनांक ९ एप्रिल रोजी शिवशक्ती हॉल (कनकनगर) कणकवली संपन्न झाली.
खलनायकाची भूमिका सादर करणाल्या अष्टपैलू सिने अभिनेत्री सौ.अक्षता कांबळी या रंगीत तालमीचे विशेष आकर्षण ठरल्या.
या दशावतार नाट्य प्रयोगासाठी सर्व महिला कलाकारांनी घेतलेली मेहनत अत्यंत प्रशंसनीय असल्याचे ज्येष्ठ लेखक व कलाकर्मी श्री राजेश राणे यांनी सामाजीक मंचावर सांगितले.
श्री.राजेश राणे हे लोककला ,कोकणी ,मालवणी आणि मराठी संस्कृतीचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.
सौ. अक्षता कांबळींसह आजच्या नवयुवती तळकोकणातल्या पारंपारिक प्राचीन दशावतार लोककलेचा वारसा पुढे घेऊन जात आहेत हे पाहून कोकणी मालवणी असल्याचा आपल्याले गर्व वाटला असेही लेखक राणेंनी सांगितले आहे.
लवकरच कणकवलीत याच नाट्यप्रयोगाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होईल. सिंधुरत्न फाऊंडेशन अध्यक्षा सौ.अक्षताताई कांबळी आणि सर्व कलाकार तंत्रज्ञ यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या चाहत्यांनीही सर्व संचाला शुभेच्छा दिल्या आहेत.