मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण व शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाथ पै जीवन दर्शन स्पर्धा’ परीक्षेचे आयोजन वराडकर हायस्कूल कट्टा येथे
करण्यात आले होते.
यावेळी दीपक भोगटे यांनी विद्यार्थ्याना नाथ पै जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली.
मुख्याध्यापक कांबळी सर यानी या परीक्षेचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
संजय नाईक सर यांनी या जन्मशताब्दी वर्षात वराडकर हायस्कूल व सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केला. व सेवांगणास सर्वतोपरी सहकारी करण्याची ग्वाही दिली.
या परीक्षेस हायस्कूलमधील
२४५ विद्यार्थी सहभागी झाले. या कार्यक्रमास
वराडकर हायस्कलचे मुख्याध्यापक कांबळी सर, कार्यकारिणी सदस्य बापू वराडकर, संजय नाईक सर, राऊळ मॅडम, भाट सर, वाजंत्री सर, दीपक भोगटे, श्रीधर गोंधळी उपस्थित होते.