फाऊंडेशनच्या अध्यक्ष व बाॅलिवुड अभिनेत्री अक्षता कांबळींच्या उपस्थितीत झाला सन्मान..!
कणकवली | प्रतिनिधी : हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याचे औचित्य साधून गाव गाता गजाली फेम चे लेखक श्री प्रभाकर भोगले यांच्या कळसुली येथील घरी जाऊन सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्ष अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी आपल्या महिला कलाकारांसोबत सदिच्छा भेट घेत सिंधुरत्न फाऊंडेशनच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी श्री भोगले यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. दशावतार ही कला कोकणात कशी आली ,ती का व कशी सादर करावी हे समजून सांगितले , घर संसार सांभाळून ,पार्लर व्यवसाय समाजसेवा ,अभिनय ,नाटक हे सर्व सहजपणे समभाळत असणाऱ्या सौ अक्षता कांबळी यांना शाबासकी देत त्यांना कौतुकाची थाप देत आशिर्वाद दिले ,यावेळी सिंधुदुर्ग प्रतिष्ठान चे कार्याध्यक्षआमचे बंधू श्री राजेश राणे हजर होते ,सिंधुरत्न फाऊंडेशन चे सिद्धेश कांबळी ,अनुज कांबळी ,सौ साक्षी आंमडोस्कर ,सुप्रिया पाटील,मानसी कांबळे,शिवानी डीचोलकर,अनिशा राऊळ,सुचिता भोगले उपस्थित होत्या ,यावेळी श्री भोगले यांनी सर्व कलाकार ना आशीर्वाद देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री व फाऊंडेशन अध्यक्ष सौ.अक्षता कांबळी यांनी प्रभाकर भोगलेंनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानून कार्यक्रमची सांगता केली