मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : काेचरा नं.२ या प्राथमिक शाळेचे उपक्रमशिल प्राथमिक शिक्षकविनाेद राजाराम मेतर यांना कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबलट्रस्ट,बेळगांव संचालित विजयालक्श्मी साेशल फाैंडेशन सांगाेला,पंढरपूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्शशिक्षक पुरस्कार शिवाजी पार्क, दादर ,मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला डाॅ.एन्.एम्.साली,डाॅ.जनार्दन माेहिते,डाँ.सुरेश कुराडे,प्रा.कांबळेदत्तात्रय पाटील,डाँ.अमर कांबळे,डाँ.ग्लाेरी अराेकियन,राकेश डाेनवलेकर,सुनिल जाधव,डाँ.पद्मजा खटावकर,प्रा.शांतिनाथ मांगले,सुप्रियाताई चांदूगडे,विमल हट्टीमणी,डाँ.विक्रम शिंगाडे आदीमान्यवर उपस्थित हाेते.
विनाेद मेतर हे जिल्ह्यातील एक उपक्रम शिक्षक म्हणून ओळखले जातात.आपल्या १७वर्षांच्या सेवेच्या कालखंडात त्यानी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग तेरा वर्षे, जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आठ वर्षे पहिल्या तीन क्रमांकात स्थान मिळवले आहे.बारामती येथीलराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांनी बनविलेल्या माॅडेलला उत्तेजनार्थ पारिताेषिक मिळाले.सन २०१५ मध्ये काेचरा ग्रा.पं.चागुणवंत शिक्षक पुरस्कार, शिक्षक समिती वेंगुर्लेचा शिक्षक भूषण पुरस्कार त्याना मिळाला असून त्यानी राज्यस्तरीय प्रशिक्षणात अनेक वेळा भाग घेतला आहे.तालुका व केंद्र स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.या व्यतिरिक्त चित्रकला,कार्यानुभव,नाट्य,कला,संमाेहन,नेपथ्य,दिग्दर्शन,गणेश सजावट,कथा काव्यलेखन,निवेदन,सूत्रसंचालन आदी छंदत्यानी जाेपासले आहेत.विद्यार्थीप्रिय शिक्शक म्हणून ते ओळखले जातात. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.