तळाशिल | वैभव माणगांवकर : मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील बहुचर्चित तळाशिल वाडितील ग्रामस्थांचे उपोषण सुरु झाले आहे.
सरकार व प्रशासनातर्फे गावाला कायमस्वरुपी आणि सलग असा टिकाऊ बंधारा घालण्यात यावा अशी तळाशिल ग्रामस्थांची गेली कित्येक वर्षांची मागणी अजूनही प्रलंबित असल्याने हे आंदोलन व बेमुदत उपोषण करण्यात येत आहे.
गेल्या महिन्याभरात तळाशिल येथिल जवळपास बारा फूट समुद्रकिनाराच लाटांनी तोडून व वाहून नेल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी सरकार व प्रशासनाला निवेदन दिले होते. सदर निवेदनामध्ये त्यांनी पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
आज सकाळी दहा वाजल्यापासून गावातील स्त्रिया,मुली आणि सर्व ग्रामस्थ, एक शांततापूर्ण फेरी काढून उपोषणस्थळी गेले.
गावचे माजी सरपंच,तळाशिल ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष, अनेक मुंबईस्थित चाकरमानी तळाशिलकर यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषणाला सुरवात केली आहे.