24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातून स्वामी समर्थ दर्शनास प्रारंभ!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गाभारा नूतनीकरणा नंतर श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न झाला. दोन महिन्या पेक्षा अधिक कालावधीनंतर नूतन स्वरूपातील गाभार्‍यात स्वामी दर्शन झाल्याने हजारो स्वामी भक्तांचे मन प्रसन्न झाले.

यावेळी आमदार आशिष शेलार, मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, नरेंद्र हेटे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या नित्यक्रम उपासना पुस्तकीचे प्रकाशन करून भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन श्री महेश इंगळे म्हणाले, श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या या गाभारा नूतनीकरणाचे काम मंदिर समितीने हाती घेतल्यानंतर ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा मानस होता. आणि ही मंदिर समितीची मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला स्वामींनी दिली.

यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्थ महेश गोगी, अमेय हेटे, मंजिरी हेटे, नरेंद्र हेटे, मंदार महाराज पुजारी, संजय पवार, रवी मलवे, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी आदींसह हजारो स्वामी भक्त उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गाभारा नूतनीकरणा नंतर श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न झाला. दोन महिन्या पेक्षा अधिक कालावधीनंतर नूतन स्वरूपातील गाभार्‍यात स्वामी दर्शन झाल्याने हजारो स्वामी भक्तांचे मन प्रसन्न झाले.

यावेळी आमदार आशिष शेलार, मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, नरेंद्र हेटे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या नित्यक्रम उपासना पुस्तकीचे प्रकाशन करून भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन श्री महेश इंगळे म्हणाले, श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या या गाभारा नूतनीकरणाचे काम मंदिर समितीने हाती घेतल्यानंतर ते लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा मानस होता. आणि ही मंदिर समितीची मोठी जबाबदारी होती. ही जबाबदारी पूर्ण करण्याची शक्ती आम्हाला स्वामींनी दिली.

यावेळी सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्थ महेश गोगी, अमेय हेटे, मंजिरी हेटे, नरेंद्र हेटे, मंदार महाराज पुजारी, संजय पवार, रवी मलवे, श्रीकांत मलवे, श्रीशैल गवंडी आदींसह हजारो स्वामी भक्त उपस्थित होते.

error: Content is protected !!