दिडशे पेक्षा जास्त संघटना सदस्यांच्या उपस्थित करण्यात आली निवड.
वैभववाडी | नवलराज काळे : ‘डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब सिंधुदुर्ग’ ( ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथि व डेंटल ) या खाजगी डॉक्टरांच्या संघटनेची वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच हॉटेल नीलम कंट्रीसाईड, कणकवली येथे संपन्न झाली. या सभेला दिडशे पेक्षा जास्त संघटना सदस्यांनी उपस्थित होते.
सन 2019 ते 22 या तीन वर्षाच्या कालखंडात, कोरोनाच्या वैश्विक साथजन्य संकट काळात, संघटना पातळीवरील सांघिक कामाच्या जोरावर आगामी सन 2022 ते 25 अशा तीन वर्षांसाठी विद्यमान अध्यक्ष डॉ राजेंद्र पाताडे व त्यांच्या संपूर्ण टीमला जिल्हा संघटनेचा कारभार सर्वानुमते आवाजी मताने दुसऱ्यांदा सुपूर्द करण्यात आला.
जिल्हा गव्हर्निंग कौन्सिल मध्ये अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाताडे (वैभववाडी), सचिव डॉ.सुहास पावसकर (कणकवली) सहसचिव डॉ.संदीप नाटेकर(कणकवली), उपाध्यक्ष डॉ.राजेश्वर उबाळे(वेंगुर्ले) डॉ.दर्षेश पेठे(सावंतवाडी), खजिनदार डॉ.शरदचंद्र काळसेकर(मालवण), सहखजिनदार डॉ. सतीश लिंगायत(देवगड) तसेच सन्मा. कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ. राजेश नवांगुळ(सावंतवाडी),डॉ.संजीव आकेरकर(कुडाळ), डॉ.गुरुराज कुलकर्णी(कुडाळ), डॉ.मिलिंद काळे(वेंगुर्ले), डॉ.राजेंद्र पारकर(देवगड),डॉ.मयूर मुरकर(मालवण) तर स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. सुखानंद भागवत(तरेले) डॉ.दीपक ठाकूर(कुडाळ) यांचा समावेश आहे.
डॉ.विवेक रेडकर(मालवण), डॉ.प्रल्हाद मंचेकर(वेंगुर्ला) ,डॉ.प्रफुल आंबेरकर (कणकवली) या मागील कालखंडातील सल्लागारांच्या समवेत पुढील तीन वर्षासाठी डॉ.संजय सावंत(कुडाळ), डॉ.अमुल पावसकर(सावंतवाडी), डॉ.मिलिंद कुलकर्णी(तरेळे), डॉ. ऋचा कुलकर्णी(तरेळे), डॉ.संजय मराठे(वैभववाडी),डॉ. केतकी जामसंडेकर( देवगड) यांची सल्लागार म्हणून नव्याने सभाग्रहाने नियुक्ती केली.
कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड.अजित भणगे व ॲड.राजेंद्र रावराणे यांची तीन वर्षासाठी तर ऑडिटर म्हणून सारंग असोसिएट, कुडाळ यांची एका वर्षासाठी एकमताने निवड करण्यात आली.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ राजेंद्र पाताडे यांनी आगामी दृष्टीक्षेपातील बेसिक लाईफ सपोर्ट सारखे सामाजिक उपक्रम, खाजगी डॉक्टरचे स्वःहक संरक्षण, नवीन सदस्य नोंदणी कार्यक्रम , घटनासमिती नियुक्ती व घटना दुरुस्ती, जैव वैद्यकिय कचरा विल्हेवाट, बॉम्बे नर्सिंग ॲक्ट क्लिनिक तथा हॉस्पिटल चे रजिस्ट्रेशन, निरंतर वैद्यकीय शिक्षणा अंतर्गत चर्चा सत्रे,संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम करणे अशा अनेक विषयांवर मी आणि माझे गव्हर्निंग कौन्सिल तळमळीने काम करणार असल्याचे सांगून, उपस्थित सर्वांचे, पुनश्च अध्यक्ष म्हणून निवड केल्या बाबत ऋण व्यक्त करून, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ.मसुरेकर रारांच्या पवित्र स्मृतिस अभिवादन केले.
सभेचे प्रास्ताविक व सूत्र संचलन डॉ.सुहास पावसकर तर आभार प्रदर्शन डॉ.राजेश नवांगुळ यांनी केले.
सदर सभेस गव्हर्निंग कौन्सिल चे सर्व पदाधिकारी, सर्व सन्मा.सदस्य , सल्लागार पदी असणारे सदस्य या व्यतिरिक्त सभागृहात उपस्थित डॉक्टर्स मध्ये डॉ.रवींद्र जोशी, डॉ.राहुल वालावलकर, डॉ.विवेक पाटणकर, डॉ.प्रवीण बिरमोळे डॉ.नितीन शेटये, डॉ.विद्याधर तायशेटे,डॉ.प्रशांत मोघे,डॉ. शमीता बिरमोळे, डॉ प्रकाश बावधनकर, डॉ.दिलीप पाळेकर, डॉ.हर्षद पवार,डॉ.गीता मोघे, डॉ.बी जी शेळके,डॉ.गुरू गणपत्ये, डॉ.गौरी गणपत्ये,डॉ.संतोष जाधव, डॉ.सुधीर रेडकर, डॉ.विनय शिरोडकर,डॉ.विजय तावडे,डॉ. जी टी राणे, डॉ.प्रशांत मडव, डॉ.मिलिंद म्हसकर,डॉ.पूजा मालपेकर,डॉ.धनेश म्हसकर,डॉ.स्वप्नील शिंगाडे,डॉ.स्वप्नील राणे, डॉ,वंदन वेंगुर्लेकर,डॉ.निलेश पाकळे डॉ.प्रभुसाळगावकर,डॉ.अमेय मराठे, डॉ.आदित्य शिंदे,डॉ.संजय सावळ, डॉ.प्रसाद मालंडकर, डॉ.प्रसाद गुरव, डॉ डॉ.चंद्रकांत पुरळकर, डॉ.उपेंद्र हिर्लेकर, डॉ.प्रवीण मेस्त्री,डॉ.पराग नायगावकर, डॉ.गुरू सौदत्ती, डॉ.बलराज यळकोटे, डॉ.उमेश बालन, डॉ.सुधीर रेडकर,डॉ.सुरेखा काळे, डॉ.निलेश पेंडूरकर,डॉ.संजय कोळी,डॉ.अभिजीत कणसे,डॉ.सर्वेश नारकर ,डॉ.सुहास पिसे,डॉ.भालचंद्र पिसे डॉ.रोहन तडूळे,डॉ.युवराज निकम,डॉ.अमित गोखले, डॉ.महेश परब,डॉ.भावना पाताडे आदी डॉक्टर्स उपस्थित होते.