मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.प्रशालेतील मुख्याध्यापक श्री.जयसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला .
दीपप्रज्वलन आणि ‘सावित्रीबाई फुले’यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्त्री-पुरुष समानता’या मूल्यावर आधारित ‘आश्वासक चित्र’नावाची एक नाटूकली सादर केली.
इयत्ता आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी लता मंगेशकर, राधिका मेनन, सिंधूताई सपकाळ, रमाबाई रानडे,अहिल्याबाई होळकर,ताराबाई भोसले,स्वाती महाडिक,पी.टी. उषा, सावित्रीबाई फुले,पी. व्ही. सिंधू,कल्पना चावला,सरोजिनी नायडू, हिरकणी,साधनाताई आमटे,सृष्टी देशमुख, मेरीन जोसेफ,इ. कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती सांगितली.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या आईस महिला दिनानिमित्त लिहिलेली पत्रे वाचून दाखविली.प्रशालेतील जेष्ठ शिक्षक श्री.प्रसाद कुबल यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत, आपल्या जीवनातील अनुभव कथन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील शिक्षिका सौ.वेदिका दळवी यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रशालेतील शिक्षिका कु.प्रतिभा केळुस्कर यांनी केले.तर आभार सौ.प्रीती सनये यांनी मानले.