नगरपरिषद राबवणार भटक्या कुत्र्यांचा निर्बिजिकरणाची मोहीम ..!
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात भटक्या कुत्र्याचा प्रादुर्भाव वाढलेला होता. या बाबत नागरिकांच्या तक्रारी नप मध्ये येत होत्या . यावर उपाय योजना म्हणून 2017 साली एका एजन्सी मार्फत मालवण नप आवारात कुत्रे निर्बिजिकरण मोहिम सुरू करण्यात आली होती.
पण नंतर या एजन्सी कडून काम करण्यास असमर्थता दाखवल्या मुळे हे काम थांबले होते. लाॅकडाऊन कालावधीनंतर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढलेला होता.
त्यांनतर मागील 2 वर्षे या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर 8 डिसेंबर 2021 ला चौथ्या वेळी केलेल्या निविदा प्रसिद्धीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
या कामाची सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन , कोल्हापूर
यांची निविदा मंजूर करण्यात आली आहे.
या कामाचे आदेश संबंधित निविदा धारकास देण्यात आले आहेत.
या नसबंदी केंद्राचे बांधकाम सध्या आडारी येथे सुरू आहे.लवकरच या ठिकाणी कुत्रे निर्बीजिकरणच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात पण होणार आहे अशी माहिती मालवण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.