26.4 C
Mālvan
Friday, April 11, 2025
IMG-20240531-WA0007

सत्यवान रेडकर यांनी केले तुळसुली बुडक्याचीवाडी येथे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सुवर्ण महोत्सव समिती.जि.प.प्राथ.शाळा बुडक्याचीवाडी(तुळसुली) येथे श्री.सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी,मुंबई सीमाशुल्क,भारत सरकार) यांचे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्राथमिक शाळा बुडक्याचीवाडी येथे आयोजित केले होते.या मार्गदर्शनाचा लाभ पंचक्रोशीतील पालक व मुलांनी घेतला.

भविष्यात आपल्या ग्रामीण भागातील मुलांना याचा फायदा होणार आहे.पंचक्रोशीतील मुलांनी,पालकांनी उत्सर्फुतपणे या व्याख्यानात सक्रिय सहभाग दर्शविला.या कार्यक्रमासाठी श्री.सत्यवान रेडकर,सौ.सुचिता तुळसुलकर सरपंच,ग्रामपंचायत तुळसुली तर्फ माणगांव,डाॅ.श्री.आनंद कासवेकर,श्री.किरण गोडकर,अध्यक्ष,श्री.मकरंद नाईक श्री.गावडेसर,सौ.नाईक अंगणवाडी सेविका ग्रा.पं. कर्मचारी श्रीम.सावंत इ.मान्यवर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला रशिया व युक्रेन युद्धात मृत्युमुखी पडलेले जवान,नागरिक,गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर,इ.यांचे निधन झाल्यामुळे उपस्थितांनी श्रद्धांजली वाहीली.श्री.देवी सरस्वती मुर्तीस पुष्पहार घालून व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख श्री.सुनिल नाईक ,सचिव यांनी केले.कार्यक्रमाच्यावेळी श्री.रेडकर,सौ.तुळसुलकर,डाॅ.श्री.आनंद कासवेकर ,या सर्वांचा सत्कार करण्यात आला.काही पालक व विद्यार्थी यांनी मार्गदर्शनाबद्धल मनोगत व्यक्त केले.व समाधान व्यक्त केले.वाडीवरील श्री.मकरंद नाईक ,श्री.रुपेश तुळसुलकर,सुदिन मेस्री,श्री.विठ्ठल गोलतकर,संतोष गोलतकर,महेंद्र नाईक,दत्तप्रसाद गोलतकर,शुभम नाईक,आदेश कदम, कासवेकर बंधु यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.श्री.मिलिंद नाईक कुडाळ पंचायत समिती सदस्य यांनी उपस्थित सर्वांना अल्पोपहार व चहाची व्यवस्था केली.

कार्यक्रमासाठी साउंड व्यवस्था श्री.भाई बिले यांनी केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दत्तप्रसाद गोलतकर, मालवण पाॅलिटेक्निक यांनी केले.आभार या शाळेची माजी विद्यार्थिनी कु.दिव्या नाईक हिने मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!