ऑस्ट्रेलियन लिजंड शेन वाॅर्नचे कार्डिआक अरेस्टने निधन.
मालवण | सुयोग पंडित : 145 कसोटीत 708 बळी आणि 194 एकदिवसीय सामन्यांत 293 बळी घेणारा आधुनिक क्रिकेट लीजंड शेन वाॅर्नचे (वय 52) थायलंडमध्ये ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
वॉर्नच्या व्यवस्थापनाने ऑस्ट्रेलियन मीडियाला दिलेल्या निवेदनात पुष्टी केली आहे की, “शेन त्याच्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यानंतर वैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले.”
1991 साली भारताविरुद्ध पदार्पण केलेल्या शेन वाॅर्नचा गोलंदाजीतील जादुई करिष्मा, सामाजिक सेलिब्रेटी स्टेटस आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या समारोपानंतर त्याने जिंकलेले पहिल्या वहिल्या आय.पि.एल.चे जेतेपद यामुळे तो नेहमीच प्रकाशझोतात राहीला.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आणि इतर कोणत्याही देशाला शेन वाॅर्न इतका चेंडू वळवू शकणारा व दीर्घकाळ खेळलेला लेगस्पिनर कसोटी खेळाडू त्याच्या निवृत्तीनंतरही मिळालेला नाही.
शेनच्या निधनाने क्रिकेट जगताला अविश्वसनीय दुःखद धक्का बसला असून सर्व क्रिकेटपटुंनी आपापल्यापरिने त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.