बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी येथे कडशी नदीपात्रावर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याविरोधात डिंगणे दशक्रोशीतील ग्रामस्थांनी लढा तीव्र करण्याचा इशारा दिल्यानंतर आज सायंकाळी उशिरा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी डिंगणे येथे येत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी स्थानिकांसह प्रत्यक्ष आडाळी येथे जात बंधाऱ्याची पाहणी केली. येत्या आठ दिवसात सावंतवाडी प्रांताधिकारी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांची डिंगणे येथे बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी तहसीलदार म्हात्रे यांनी दिले.
यावेळी डिंगणे ग्रामस्थांनी तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन सादर केले. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर, उपसरपंच जयेश सावंत, यशवंत सावंत, विलास सावंत, गीता सावंत, महादेव सावंत, दिनेश सावंत,यशवंत डिंगणेकर,फटू सावंत, गणपत परब, भिवा परब, दिगंबर रेडकर, विनोद सावंत भानुदास सावंत, अर्जुन सावंत, दीपक सावंत, शरद बांदेकर,, सोनाली सावंत, रमेश सावंत, समीक्षा सावंत, योगिता सावंत, त्रिवेणी सावंत, यामिनी सावंत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.