सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असलेले श्री.रेडकर आहेत ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते..!
मालवण | सुयोग पंडित : छत्रपती श्री. शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवराय प्रतिष्ठान ट्रस्ट, रायगड’ द्वारा आयोजित कर्जत महिला मंडळ शाळा हॉल, कर्जत, रायगड येथे रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केले गेले. या व्याख्यानासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत असलेले व ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते श्री सत्यवान यशवंत रेडकर यांनी अत्यावश्यक मौलिक व वस्तुनिष्ठ सामाजिक व शैक्षणिक मार्गदर्शन केले.
सामाजिक कार्यकर्ते व शिवराय प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नितीन औटे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी श्री. जगदिश मरगजे सर, कर्जत पोलिस स्टेशन चे निरिक्षक श्री. संदिपन सोनवणे, महिला निरिक्षक, सौ. सुनिता मॅडम, संजय धामणसे,विकास भोसले, विनोद कदम यांची विशेष उपस्थिती होती.
या उपक्रमातील लाभार्थी विद्यार्थी आणि उपस्थितांनी श्री.सत्यवान रेडकर यांच्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करुन त्यांचे आभार मानले.