२७ फेब्रुवारी रोजी पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे होणार बक्षिस वितरण..!
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. रविवार २७ फेब्रुवारी रोजी पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात येणार आहे.
तालुका पत्रकार संघाच्यावतीने पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी, महाविद्यालयीन अशा तीन गटांमध्ये कणकवली तालुक्यातील शाळांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेसाठीचे पाचवी ते सातवी गटासाठी मोबाईलचे फायदे की तोटे आणि बदलते पर्यावरण कारणे व उपाय, हे विषय देण्यात आले होते. यात १ प्रदिप्ती तुळशिदास कुबल (एस. एम. हायस्कूल), २. रिया संजय सावंत (नाटळ हायस्कूल), ३. पुष्पा प्रसाद सावंत (नाटळ हायस्कूल) यांनी यश मिळविले.
आठवी ते दहावी गटासाठी ऑनलाईन शिक्षण फायदे-तोटे आणि कोरोना काय कमावले, काय गमावले, असे विषय देण्यात आले होते. यात १. तनया प्रवीण कदम( एस. एम. हायस्कूल), २. सोहम नीलेश महेंद्रकर (आयडियल स्कूल, वरवडे), ३.
पूजा राजेश आचरेकर ( एस. एम. हायस्कूल) तर उत्तेजनार्थ श्रीराम दीपक सुतार (लोरे हायस्कूल) व नेहा प्रवीण कांबळे (कनेडी हायस्कूल ) यांनी यश मिळविले.
महाविद्यालयीन गटासाठी मेक इन इंडिया (बदलता भारत), आणि मैदानी खेळ उपयुक्तता व आरोग्य असे विषय होते. यात १. सिद्धी सुरेंद्र मोरे (टी. एस. सावंत ज्यु. कॉलेज कनेडी, २. तन्वी विजय निरुखेकर (सरस्वती नर्सिंग कॉलेज तोंडवली), ३. श्रद्धा सतीश पाटकर व शांभवी उल्हास कुलकर्णी (दोन्ही कणकवली कॉलेज) उत्तेजनार्थ दर्शना नागेश माईणकर ( एस. एम. ज्यु. कॉलेज) व पल्लवी दीपक सुतार (विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी कॉलेज तळेरे). यासाठी परीक्षक म्हणून प्रा. सीमा तांबे-हडकर, निकिता बगळे, चित्राक्षी देसाई यांनी काम पाहिले.