बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिंगणे- बांबरवाडी श्री हरीदेव मंदीर येथे गुरूवारी १७ फेब्रुवारी रोजी विविध अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व आरती संध्याकाळी ५ वाजता डेगवे येथील श्री देव स्थापेश्र्वर भजन मंडळाचे सुश्राव्य भजन, संध्याकाळी ६ वाजता नवजवान महीला मंडळ व धनगरवाडी-बांबरवाडी महीला मंडळ यांचा पारंपारीक फुगडी कार्यक्रम. ०६.३० वाजता चंद्रकांत सावंत (डिंगणे-पाशीवाडी) व दिवाकर उर्फ नितीन मावळणकर ( डिंगणे-फकीरफाटा) यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम होणार आहे. डींगणेचे सन्माननीय मानकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा परीषद सदस्या श्वेता कोरगांवकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत,सभापती निकीता सावंत, उपसभापती शितल राऊळ, जिल्हा बॅन्क संचालक महेश सारंग, सरपंच संजय डगणेकर, उपसरपंच जयेश सावंत, सरपंच बांदा अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर
रात्री ८ चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाचा अध्यात्मिक नाट्यप्रयोग ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तसेच सर्वांनी महाप्रसादाचा याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.