भविष्यात आमदार नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री होतील ; नापणे येथे माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला विश्वास.
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशानंतरच जिल्ह्यात भाजपा शत प्रतिशत असल्याचेही केले प्रतिपादन...!
वैभववाडी | नवलराज काळे : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रवेशानंतरच जिल्ह्यात भाजपा शत प्रतिशत हे नाकारून चालणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योजक तयार करूया आणि जिल्ह्यात पुढील वर्षी ‘उद्योगवर्ष’ साजरे करूया असा संकल्प आपण आजच करूया असा निश्चय माजी आमदार प्रमोद जठार यांनी बोलून दाखवला.
जिल्ह्यात विविध प्रकल्प सुरू आहेत. ते पुर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक आमदार नितेश राणे प्रयत्न करत आहेत. त्यांची कामाची पद्धत चांगली आहे.
भाजपाची राज्यात सत्ता येताच आम नितेश राणे हे कॅबिनेट मंत्री पदावर असतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नापणे ऊस संशोधन केंद्र आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जठार पुढे म्हणाले, संशोधकांच्या म्हणण्यानुसार या भागात जवळपास पंधरा लहान, मोठी धरणे आहेत. सारासार विचार केला तर भविष्यात कोकणातच साखर कारखाने जिवंत राहतील. त्यामुळे कोकणात दोन लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन झाले पाहिजे. हा प्रयोग आपण यशस्वी करूया असे जठार यांनी सांगितले.
कोकिसरे रेल्वे फाटक येथील भुयारी मार्ग काम मंजूर आहे. केंद्राकडून तब्बल 65 कोटी या प्रकल्पासाठी आले आहेत. या फाटकावर 60 रेल्वे गाड्या नेहमी ये-जा करतात. त्यामुळे बारा तास फाटक बंद असतो. या प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच होईल, याचाही आजच संकल्प करुया असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात उद्योजक निर्माण करूया. जास्तीत जास्त उद्योग येतील यासाठी प्रयत्न करूया व उद्योग वर्ष जिल्हा साजरा करुया असे जठार यांनी सांगितले. उपस्थित शेतकरी व भाजपा पदाधिकारी यांनी आमदार जठार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)