ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजप किसान मोर्चा मालवण तालुक्याच्यावतीने शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार.

भाजप किसान मोर्चा मालवण तालुक्याच्यावतीने शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार.

प्रकाशन: 22 Jan 2022 07:17 PM
वाचन संख्या 97

किसान मोर्चा मालवण तालुक्याची पदाधिका-यांची नियुक्ती पत्रे प्रदान

आचरा /विवेक परब : साल http://localhost/news/public/uploads/2020-21मध्ये शासनस्तरावर घेण्यात आलेल्या भातपिक स्पर्धेत मालवण तालुकास्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या श्री भक्तप्रल्हाद चव्हाण वाघावणे-देवली यांना प्रथम,श्री विश्वास आचरेकर निरोम यांना व्दितिय, तर श्री राम परब ,कांदळगाव तृतिय यांना अनुक्रमे भाजप तालुकाध्यक्ष-धोंडी चिंदरकर, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष-उमेश सावंत, नगर सेवक-दिपक पाटकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष-महेश सारंग यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मालवण तालुका किसान मोर्चा बाळ भोजने-कोळब व जयवंत परब-वायंगवडे यांना तालुका उपाध्यक्ष, मिलिंद लोहार-डिकवल व दिगंबर जाधव-चिंदर यांना सरचिटणीस, सुहास सावंत-पळसंब यांना चिटणीस तर प्रकाश राणे- खोटले यांना सल्लागार म्हणून नियुक्ती पत्रे देण्यात आली.
यावेळी बोलताना भाजप मालवण तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर म्हणाले कि किसान मोर्चाच्या संघटनेकडून शेतकऱ्यांनसाठी उपक्रम राबवा तसेच पदाधिका-यांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत ख-या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा तेव्हाच किसान मोर्चाचा उद्देश सफल झाला असे वाटेल. यावेळी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे, निरोम सरपंच उमेश मांजरेकर आदि मान्यवर उपस्थित होते. आभार आणि समारोप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स