नाबर स्कूल मधील विद्यार्थ्यांचा स्टडी टूर च्या माध्यमातून अनोखा उपक्रम.
बांदा |राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन.नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा मधील एम. एस. एफ. सी. विभागातील विद्यार्थ्यांची स्टडी टूर नुकतीच आस्वाद कोकम सरबत या कंपनीमध्ये घेण्यात आली. या प्रशाळेमध्ये सुरू असलेल्या मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या विभागाअंतर्गत दरवर्षी औद्योगिक विकास महामंडळ या ठिकाणी स्टडी टूर आयोजित करण्यात येत असते. या उपक्रमामध्ये विद्यार्थी प्रत्यक्षात औद्योगिक कंपन्यांमध्ये भेट देत तेथील प्रत्यक्ष कामाची पाहणी करतात तसेच तेथील कच्च्या मालावर होत असलेली प्रक्रिया याची सखोल माहिती विद्यार्थी प्रत्यक्षात भेट देऊन घेत असतात. याच उपक्रमांतर्गत इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी आस्वाद कोकम या फॅक्टरीमध्ये भेट देत तेथील प्रक्रियांची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी श्री निनाद पित्रे यांनी कोणत्या पद्धतीने प्रक्रिया करून सरबत बनवले जाते याचे संपूर्ण प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
त्याच प्रमाणे सदर प्रॉडक्ट किती किंमतीचे आहे याची कॉस्टिंग विद्यार्थ्यांनी केली. यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, नारायण पित्रे, सौ.रिया देसाई, सौ गायत्री देसाई, श्री भिकाजी गिरप, श्री राकेश परब, श्री हर्षद खडपकर हे शिक्षक उपस्थित होते.