मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण ग्रामीण रुग्णालयात मालवण पत्रकार समितीद्वारा आयोजीत मोफत आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न झाले. मालवण पत्रकार समितीच्या या आरोग्यविषयक सामाजिक उपक्रमाचा जवळपास शंभर रुग्णांनी लाभ घेतला.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. गौरव घुर्ये, डॉ. दत्तात्रय ठाकूर, डॉ. सुधीर मेहेंदळे, पत्रकार परिषद कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, मालवण पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, जिल्हा पत्रकार संघ सदस्य विद्याधर केनवडेकर, प्रफुल्ल देसाई, मनोज चव्हाण, कुणाल मांजरेकर, कृष्णा ढोलम, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, संग्राम कासले, आप्पा मालंडकर, भूषण मेथर, सिद्धेश आचरेकर, सौगंधराज बादेकर, गणेश गावकर, राहुल कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात डॉ. गौरव घुर्ये यांनी किडनी विकार, श्वसन विकार, मधुमेह या आजाराच्या रुग्णांची तपासणी केली तर डॉ. दत्तात्रय ठाकूर यांनी हाडांच्या विविध आजारांवर, मणक्याचे दुखणे, संधीवात या आजारांच्या रुग्णांची तपासणी केली.
या आरोग्य शिबिराला ग्रामीण रुग्णालयाच्या परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
या शिबिरातील मान्यवर डॉ. घुर्ये हे दर शनिवारी तर तज्ञ डॉ. ठाकूर हे प्रत्येक मंगळवारी सुमतीछाया मेडिकल नजीक सेवा देणार आहेत.
पत्रकार समितीद्वारा आयोजीत या आदर्शवत सामाजिक शिबिराची मालवण तालुक्यातील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. याद्वारे मालवण पत्रकार समितीच्या पत्रकार बांधवांनी एक सामाजिक बांधिलकी जपल्याचीही भावना जनमानसात आहे.
फोटो सौजन्य : ब्युरो, मालवण