29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

महाराष्ट्र बांबू बोर्डाकडून दुर्लक्षल्या गेलेल्या बोरबेट बांबूच्या जातीचा कोकण कृषी विद्यापीठाकडून अभ्यास सुरु…!

- Advertisement -
- Advertisement -

वैभववाडी | विशेष ब्युरो रिपोर्ट : महाराष्ट्र बांबू बोर्ड राज्यातील व राज्याबाहेरीलही बांबू या तण प्रकाराच्या विविध प्रजातींचा अभ्यास करते. परंतु त्यातील बोरबेट या जातीचा अभ्यास मात्र नेहमीच दुर्लक्षित राहीलेला होता.
आता मात्र खुद्द कोकण कृषी विद्यापिठानेच या बांबूच्या जातीचा अभ्यास सुरु करुन त्याची शास्त्रीय दखल घेतली आहे.
कधीही मर आणि फुलोरा न येणाऱ्या कोकणात आढळून येणाऱ्या बोरबेट जातीच्या बांबूची दखल घेतली असून या जातीच्या बांबूचा अभ्यास सुरु केला आहे.कोकण कृषी विद्यापीठाचे बांबू अभ्यासक अजय राणे आणि इतर अधिकाऱ्यांनी कुडाळ येथील संतोष खोत यांच्या बांबू फार्मला भेट देऊन येथील बोरबेट जातीच्या बांबूची माहिती घेतली आहे.आणि त्यानंतर या वर अभ्यास करण्यासाठी नमुने घेऊन गेले आहेत.याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.
कोकणातील वैभववाडी तालुक्यात 95 टक्के बोरबेट जातीचा बांबू आढळून येतो.या बांबूला कोणी भोअर बेट असेही म्हणतात.नावाचा अपभ्रंश असू शकतो.हा सर्वोत्कृष्ट बांबू म्हणून ओळखला जातो.याला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे.त्याला कधी मर येत नाही आणि फुलोरा येत नाही.पणजोबांच्या पिढीने लावलेल्या बोरबेट जातीच्या वांबूच्या बेटीतील बांबूचे 100 वर्षानंतर त्यांचा नातू ,पणतू उत्पन्न घेत आहे.
‘बांबूचे वय 45 वर्षे सांगणाऱ्या राज्य व देशभरातील बांबू संशोधक, अभ्यासकांना यावर अभ्यास करण्याची गरज आहे.’ वैभववाडीतील बांबू तोड व्यापारी हे बोरबेट बांबूच्या लागवडीसाठी शिफारस करतात.हा बांबू दर्जेदार आहेआणि यात चांगली गुणवत्ताही आहे.
या बहुगुणी बांबू कडे आतापर्यंत कोकण कृषी विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे.तर महाराष्ट्र वांबू बोर्डाकडून उच्च दर्जाचा बांबू त्यांच्या यादीतून बेदखल केला गेला आहे. वेळोवेळी या बांबूचं महत्व लक्षात आणून दिल्यानंतर आता कोकण कृषी विद्यापीठाने त्याची दखल घेतली आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे बांबू अभ्यासक अजय राणे आणि इतर अधिकऱ्यानी नुकतीच कुडाळ येथील बांबू शेतकरी संतोष खोत यांच्या शेताला भेट दिली.यावेळी त्यांनी बोरबेट जातीचे बांबू अभ्यास करण्यासाठी घेऊन गेले आहेत,अशी माहिती संतोष खोत यांनी दिली आहे.आता या बांबू बाबतचा अहवाल कोकण कृषी विद्यापीठाकडून लवकरच अपेक्षित आहे.
दरम्यान सावंतवाडी येथील बांबू शेतकरी मायकल डिसोझा यांच्या शेतातील माणगा जातीच्या 2 हजार बेटीना मर आल्याने सर्वच धास्तावले आहेत.तर शेतकरी संतोष खोत यांनी सांगितले माझ्या शेतात माणगा आणि बोरबेट बांबूच्या बेटी आहेत.मी दोन्ही प्रकारची कंदमूळ विकतो.आम्ही फक्त बोरबेट जातीच्या बांबुची हमी देतो असे ते म्हणाले.आता कुडाळ येथील काही गावात बोरबेट जातीचे बांबू लावायला सुरवात केली आहे,अशी त्यांनी माहिती संतोष खोत यांनी दिली आहे.सध्या रोपांची निर्मिती नसल्याने या बांबूची लागवड कंदमुळाद्वारे होते.ऊसाची कांडी पद्धतीसारखं रोप बनविण्याचे काम संध्या वैभववाडी येथील एका शेतकऱ्याने सुरु केले आहे.हा शेतकरी स्वतःसाठी दोन हजार रोपे तयार करीत असल्याची माहिती मिळत आहे.
बांबुच्या या जातीचा केला जाणारा शास्त्रीय अभ्यास आगामी काळातील कृषीरोजगार हमीचेही संकेत देणारा आहे असेच आशादायक चित्र सध्यातरी दिसत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

वैभववाडी | विशेष ब्युरो रिपोर्ट : महाराष्ट्र बांबू बोर्ड राज्यातील व राज्याबाहेरीलही बांबू या तण प्रकाराच्या विविध प्रजातींचा अभ्यास करते. परंतु त्यातील बोरबेट या जातीचा अभ्यास मात्र नेहमीच दुर्लक्षित राहीलेला होता.
आता मात्र खुद्द कोकण कृषी विद्यापिठानेच या बांबूच्या जातीचा अभ्यास सुरु करुन त्याची शास्त्रीय दखल घेतली आहे.
कधीही मर आणि फुलोरा न येणाऱ्या कोकणात आढळून येणाऱ्या बोरबेट जातीच्या बांबूची दखल घेतली असून या जातीच्या बांबूचा अभ्यास सुरु केला आहे.कोकण कृषी विद्यापीठाचे बांबू अभ्यासक अजय राणे आणि इतर अधिकाऱ्यांनी कुडाळ येथील संतोष खोत यांच्या बांबू फार्मला भेट देऊन येथील बोरबेट जातीच्या बांबूची माहिती घेतली आहे.आणि त्यानंतर या वर अभ्यास करण्यासाठी नमुने घेऊन गेले आहेत.याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे.
कोकणातील वैभववाडी तालुक्यात 95 टक्के बोरबेट जातीचा बांबू आढळून येतो.या बांबूला कोणी भोअर बेट असेही म्हणतात.नावाचा अपभ्रंश असू शकतो.हा सर्वोत्कृष्ट बांबू म्हणून ओळखला जातो.याला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे.त्याला कधी मर येत नाही आणि फुलोरा येत नाही.पणजोबांच्या पिढीने लावलेल्या बोरबेट जातीच्या वांबूच्या बेटीतील बांबूचे 100 वर्षानंतर त्यांचा नातू ,पणतू उत्पन्न घेत आहे.
'बांबूचे वय 45 वर्षे सांगणाऱ्या राज्य व देशभरातील बांबू संशोधक, अभ्यासकांना यावर अभ्यास करण्याची गरज आहे.' वैभववाडीतील बांबू तोड व्यापारी हे बोरबेट बांबूच्या लागवडीसाठी शिफारस करतात.हा बांबू दर्जेदार आहेआणि यात चांगली गुणवत्ताही आहे.
या बहुगुणी बांबू कडे आतापर्यंत कोकण कृषी विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे.तर महाराष्ट्र वांबू बोर्डाकडून उच्च दर्जाचा बांबू त्यांच्या यादीतून बेदखल केला गेला आहे. वेळोवेळी या बांबूचं महत्व लक्षात आणून दिल्यानंतर आता कोकण कृषी विद्यापीठाने त्याची दखल घेतली आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे बांबू अभ्यासक अजय राणे आणि इतर अधिकऱ्यानी नुकतीच कुडाळ येथील बांबू शेतकरी संतोष खोत यांच्या शेताला भेट दिली.यावेळी त्यांनी बोरबेट जातीचे बांबू अभ्यास करण्यासाठी घेऊन गेले आहेत,अशी माहिती संतोष खोत यांनी दिली आहे.आता या बांबू बाबतचा अहवाल कोकण कृषी विद्यापीठाकडून लवकरच अपेक्षित आहे.
दरम्यान सावंतवाडी येथील बांबू शेतकरी मायकल डिसोझा यांच्या शेतातील माणगा जातीच्या 2 हजार बेटीना मर आल्याने सर्वच धास्तावले आहेत.तर शेतकरी संतोष खोत यांनी सांगितले माझ्या शेतात माणगा आणि बोरबेट बांबूच्या बेटी आहेत.मी दोन्ही प्रकारची कंदमूळ विकतो.आम्ही फक्त बोरबेट जातीच्या बांबुची हमी देतो असे ते म्हणाले.आता कुडाळ येथील काही गावात बोरबेट जातीचे बांबू लावायला सुरवात केली आहे,अशी त्यांनी माहिती संतोष खोत यांनी दिली आहे.सध्या रोपांची निर्मिती नसल्याने या बांबूची लागवड कंदमुळाद्वारे होते.ऊसाची कांडी पद्धतीसारखं रोप बनविण्याचे काम संध्या वैभववाडी येथील एका शेतकऱ्याने सुरु केले आहे.हा शेतकरी स्वतःसाठी दोन हजार रोपे तयार करीत असल्याची माहिती मिळत आहे.
बांबुच्या या जातीचा केला जाणारा शास्त्रीय अभ्यास आगामी काळातील कृषीरोजगार हमीचेही संकेत देणारा आहे असेच आशादायक चित्र सध्यातरी दिसत आहे.

error: Content is protected !!