24.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

विकास कामांना विरोध करण्यात उपाध्यक्ष यांनी आपली पाच वर्षे फुकट घालवली : माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर.

- Advertisement -
- Advertisement -

आपल्या सोयीप्रमाणे आमदार यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून उपाध्यक्षांनी स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये असा महेश कांदळगांवकर यांचा प्रत्युत्तराचा स्मॅश..

मालवण | प्रतिनिधी : मालवणात भुयारी गटार योजना आणि अन्य नगरपरिषद प्रकल्पांबाबत गटनेते कुशे व उपाध्यक्ष राजन वराडकर यांनी केलेल्या टीकेला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांची कार्यशैली आणि पूर्तता झालेल्या कामांची यादी यांची आठवण करुन देत प्रत्युत्तराचा राजकीय स्मॅश मारला आहे.


“मालवण नगरपरीषदेत साल 2011 ते 2016 या पाच वर्षांच्या उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळात चुकीच्या नियोजना मुळे बंद पडलेली भुयारी गटार योजना आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत मग अपयशी कोण ठरले होते याचे आत्मपरीक्षण उपाध्यक्ष यांनी करावं. आपल्या सोयीप्रमाणे आमदार यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. मागच्या 2 वर्षी पासून कोरोना कालावधीत अडचणीमुळे या कामाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही ही वस्तुतिथी आहे, तरी ही योजना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता अचानक यांच्याच काळातील, मर्जीतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा मुद्दा का आला या मागच कुठले ‘कारण’ आहे हे पण एक कोड आहे. आमच्या कालावधीत या ठेकेदाराला दिलेली बिलं ही भुयारी गटारसाठी प्राप्त निधीतून दिली आहेत. जर ती चुकीच्या पद्धतीने दिली असतील तर तशी तक्रार शासन दरबारी करा. पण याच वेळी आपल्या कालावधीत याच ठेकेदारांची बिलं भुयारी गटर चा निधी नसल्याने कर्मचारी यांच्यासाठी राखीव निधीतून कुणाचीही परवानगी न घेता दिली गेली याच मागचं ‘कारण’ पण उपाध्यक्ष यांनी योग्य ‘अर्थ’ काढून स्पष्ट करावे. आपल्या अर्थकारणाला आमच्या कालावधीत चाप बसल्याने आपण वारंवार विकास कामात अडथळा आणत आहात “, असे स्पष्ट करताना “उपाध्यक्षांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्द ही आपण निवडुन आलेल्या पक्षाच्या विरुद्ध कामे करण्यात आणि लोकोपयोगी काम बंद करणे या एक कलमी कार्यक्रमात फुकट घालवली आहे “, असा आक्रमक टोलाही लगावला आहे.

नगरपरिषदेच्या इमारत परिसर सुशोभीकरण करताना केलेल्या प्लॅनमधील आपल्या गडग्याच्या बाजूने जाणार अंतर्गत रस्ता अन्य ठिकाणाहून नेण्यात यावी अशी नप ला नेहमी सहकार्य करणारे लगतचे कब्जेदार जोशी यांनी विनंती केल्यामुळे तो रस्ता रद्द करण्यात आला. ‘नप च्या अंतर्गत रस्त्यामुळे आमचा फायदा झाला’, हा कुठला जावईशोध लावला हे कायम फायदा बघणारे उपाध्यक्ष आणि कुशेच सांगू शकतील. आमच्या फायद्याचे टेंडर मंजूर केले असे म्हणता तर हे टेंडर 10 % कमी दराने मंजूर केले आहे याची पण माहिती घ्यावी . आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे टेंडर न मिळाल्याने आणि जे टेंडर आम्ही मंजूर केले ते 10 ℅ कमी दराचे असल्याने या ठेकेदाराला त्रास देण्याच्या दृष्टीने असे खोटे नाटे आरोप या द्वयी कडून होत आहेत.
आपली सकारात्मक वृत्ती असती तर या सुशोभीकरण प्लॅन बद्दल आपणास पूर्व माहिती पण दिली असती. पण आपण फक्त विरोधाला विरोध आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पाच वर्षे नप मध्ये मालवण च्या विकासाला खिळ घालण्याचं काम केलेले आहे. मालवण च्या क्रीडापटुंसाठी साईमंदिर नजीक सिंधुदुर्ग कॉलेज यांच्या कडून 99 वर्षांसाठी लीज वर
घेतलेल्या जागेतील स्पोर्ट्स कॉम्लेक्स मधील स्विमिंग पूल पूल आणि बॅडमिंटन हॉल चे काम बंद पाडून खेळाडूचे नुकसान करण्याचं काम आपण केलेले आहे.”
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या आक्रमक स्मॅशने मालवण शहरातील पूर्ण विकासकामांच्या प्रक्रियांची अधिकृत उत्तरे जनतेला मिळावीत अशाच उद्देशाने ही कार्याची यादी व उपाध्यक्ष व गटनेते कुशेंना प्रत्युतत्तराचा दाखला दिला गेला असल्याचे स्पष्ट होत आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आपल्या सोयीप्रमाणे आमदार यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून उपाध्यक्षांनी स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये असा महेश कांदळगांवकर यांचा प्रत्युत्तराचा स्मॅश..

मालवण | प्रतिनिधी : मालवणात भुयारी गटार योजना आणि अन्य नगरपरिषद प्रकल्पांबाबत गटनेते कुशे व उपाध्यक्ष राजन वराडकर यांनी केलेल्या टीकेला माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांची कार्यशैली आणि पूर्तता झालेल्या कामांची यादी यांची आठवण करुन देत प्रत्युत्तराचा राजकीय स्मॅश मारला आहे.


"मालवण नगरपरीषदेत साल 2011 ते 2016 या पाच वर्षांच्या उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळात चुकीच्या नियोजना मुळे बंद पडलेली भुयारी गटार योजना आम्ही सत्तेत आल्यानंतर आमच्या आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घेऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत मग अपयशी कोण ठरले होते याचे आत्मपरीक्षण उपाध्यक्ष यांनी करावं. आपल्या सोयीप्रमाणे आमदार यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढून स्वतःची पाठ थोपटून घेऊ नये. मागच्या 2 वर्षी पासून कोरोना कालावधीत अडचणीमुळे या कामाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही ही वस्तुतिथी आहे, तरी ही योजना पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आता अचानक यांच्याच काळातील, मर्जीतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा मुद्दा का आला या मागच कुठले 'कारण' आहे हे पण एक कोड आहे. आमच्या कालावधीत या ठेकेदाराला दिलेली बिलं ही भुयारी गटारसाठी प्राप्त निधीतून दिली आहेत. जर ती चुकीच्या पद्धतीने दिली असतील तर तशी तक्रार शासन दरबारी करा. पण याच वेळी आपल्या कालावधीत याच ठेकेदारांची बिलं भुयारी गटर चा निधी नसल्याने कर्मचारी यांच्यासाठी राखीव निधीतून कुणाचीही परवानगी न घेता दिली गेली याच मागचं 'कारण' पण उपाध्यक्ष यांनी योग्य 'अर्थ' काढून स्पष्ट करावे. आपल्या अर्थकारणाला आमच्या कालावधीत चाप बसल्याने आपण वारंवार विकास कामात अडथळा आणत आहात ", असे स्पष्ट करताना "उपाध्यक्षांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्द ही आपण निवडुन आलेल्या पक्षाच्या विरुद्ध कामे करण्यात आणि लोकोपयोगी काम बंद करणे या एक कलमी कार्यक्रमात फुकट घालवली आहे ", असा आक्रमक टोलाही लगावला आहे.

नगरपरिषदेच्या इमारत परिसर सुशोभीकरण करताना केलेल्या प्लॅनमधील आपल्या गडग्याच्या बाजूने जाणार अंतर्गत रस्ता अन्य ठिकाणाहून नेण्यात यावी अशी नप ला नेहमी सहकार्य करणारे लगतचे कब्जेदार जोशी यांनी विनंती केल्यामुळे तो रस्ता रद्द करण्यात आला. 'नप च्या अंतर्गत रस्त्यामुळे आमचा फायदा झाला', हा कुठला जावईशोध लावला हे कायम फायदा बघणारे उपाध्यक्ष आणि कुशेच सांगू शकतील. आमच्या फायद्याचे टेंडर मंजूर केले असे म्हणता तर हे टेंडर 10 % कमी दराने मंजूर केले आहे याची पण माहिती घ्यावी . आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे टेंडर न मिळाल्याने आणि जे टेंडर आम्ही मंजूर केले ते 10 ℅ कमी दराचे असल्याने या ठेकेदाराला त्रास देण्याच्या दृष्टीने असे खोटे नाटे आरोप या द्वयी कडून होत आहेत.
आपली सकारात्मक वृत्ती असती तर या सुशोभीकरण प्लॅन बद्दल आपणास पूर्व माहिती पण दिली असती. पण आपण फक्त विरोधाला विरोध आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पाच वर्षे नप मध्ये मालवण च्या विकासाला खिळ घालण्याचं काम केलेले आहे. मालवण च्या क्रीडापटुंसाठी साईमंदिर नजीक सिंधुदुर्ग कॉलेज यांच्या कडून 99 वर्षांसाठी लीज वर
घेतलेल्या जागेतील स्पोर्ट्स कॉम्लेक्स मधील स्विमिंग पूल पूल आणि बॅडमिंटन हॉल चे काम बंद पाडून खेळाडूचे नुकसान करण्याचं काम आपण केलेले आहे."
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या आक्रमक स्मॅशने मालवण शहरातील पूर्ण विकासकामांच्या प्रक्रियांची अधिकृत उत्तरे जनतेला मिळावीत अशाच उद्देशाने ही कार्याची यादी व उपाध्यक्ष व गटनेते कुशेंना प्रत्युतत्तराचा दाखला दिला गेला असल्याचे स्पष्ट होत आहे .

error: Content is protected !!