मालवण | विशेष : महामानव आणि घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर बनण्यामागे रमाबाई भीमराव आंबेडकर या अखंड तेवलेल्या समईचे भरपूर मोठे श्रेय होते. बाबासाहेबांना त्यांच्या पदवी व एकंदर अभ्यासातच कसलीच मानसीक तणाव तथा कुठल्याच प्रकारची अडचण येऊ नये या करिता त्यांनी स्वतःवर ओढवत असलेल्या कष्टांची बाबासाहेबांना कधीच जाणीव होऊ दिली नव्हती. रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वानंदगावातील एका गरीब कुटुंबात झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे -वलंगकर व आई रुक्मिणी भिकू धुत्रे यांच्यासह त्या आपल्या दाभोळजवळील वानंदगावात राहत होत्या. त्यांचे वडिल भिकू धोत्रे हे दाभोळ बंदरातील माश्यांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचविण्याचे काम करीत असतं.
रमाबाई यांचे कुटुंब एक मोठ कुटुंब होतं. त्यांच्या परिवारात आई वडिलांसोबतच त्यांना तीन बहिणी व एक भाऊ होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले होते. रमाबाई लहान असतांना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले. त्यांच्या आई रुक्मिणी धुत्रे यांचे आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे रमाबाई यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला. कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले.आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला होता. कारण त्यांच्यावर आपल्या लहान भाऊ आणि बहिणीची जबाबदारी आली होती. यानंतर त्या आपल्या वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा यांच्यासोबत मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत राहायला गेले.रमाबाई आपल्या भावंडान सोबत मुंबईत आपल्या काका व मामा सोबत राहत होत्या. त्या काळी बालविवाह प्रथा समाजात रूढ होती. त्यामुळे त्यांचा विवाह त्यांच्या लहानपणीच करण्यात आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्याकरिता मुलगी पाहत होते.रमाबाई आपल्या भावंडांसोबत मुंबईत आपल्या काका व मामा सोबत राहत होत्या. त्या काळी बालविवाह प्रथा समाजात रूढ होती. त्यामुळे त्यांचा विवाह त्यांच्या लहानपणीच करण्यात आला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडिल सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्याकरिता मुलगी पाहत होते.
त्यांना भायखळा घयेथे लग्नाची मुलगी आहे असे समजले. त्यांनी वलंगकर यांना लग्नाची मागणी केली. रमाबाई व भीमराव आंबेडकर यांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये ई.स. १९०६ साली झाले. लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय १४ वर्षाचे तर, रमाबाई ह्या केवळ ९ वर्षांच्या होत्या.
रमाबाईंनी जीवनात खूप दु:ख सहन केलं आहे.रमाबाई यांचे लग्न त्याकाळीन बाल विवाह प्रथेनुसार करण्यात आले होते. लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब ई.स. १९२३ साली आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले. यानंतर रमाबाई संपूर्णपणे एकट्या पडल्या, त्यांना जीवनात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी खूप कष्ट सहन करावं लागलं. त्या जिद्दीने आपल्या दु:खांचा आणि अडचणींचा सामना करत होत्या.बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देऊ केलेली मदत रमाबाई यांनी नाकारली कारण, त्या एका स्वाभिमानी पतीच्या स्वाभिमानी पत्नी होत्या. रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप मरणं पहिली. लहानपणीच आई व त्यानंतर वडिल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लग्नाच्या अवघ्या ७ वर्षानंतर पित्यासमान सासरे रामजी सुभेदार यांचा १९१३ साली मृत्यू झाला.बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला असतांना ई.स.१९१४ ते १९१७ साली रमेश यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब परदेशात आपल्या शिक्षणात मग्न असल्यामुळे रमाबाई यांनी त्यांना या बद्दल काहीच कल्पना दिली नाही. त्याचप्रमाणे ऑगस्ट १९१७ साली झालेला बाबांच्या सावत्र आई जिजाबाई यांचा मृत्यू, पाठोपाठ मुलगी इंदू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव व त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू असे प्रसंग त्यांच्या जीवनात त्यांनी बाबासाहेबांच्या अनुपस्थित उद्भवले होते. बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि कार्यकर्त्यांनी देऊ केलेली मदत त्यांनी घेतली नव्हती किंवा ‘एकटी अबला बाई’वगैरे टॅगमध्ये स्वतःला अडकवलेलं नव्हतं तेही न कुरकुरता….! या एका वाक्यात समर्पिता रमाबाई लिहीताना व वाचताना सहज मावेल पण जगताना ते शक्य होणे फक्त रमाबाईच शिकवू व दाखवू शकतील. १९२१साली रमाबाई यांच्या जीवनात सर्वात मोठी दुःखद घटना घडली ती म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा बाळ गंगाधर आणि नंतर १९२६ मध्ये राजरत्न यांचा मृत्यू त्यांना पाहावा लागला. इतक सर्व त्यांच्या सोबत घडत असतांना देखील त्यांनी या बद्दल बाबासाहेबांना काहीच सांगितले नाही. घरातील एकेक जणांचा मृत्यू झाल्याने त्या एकट्या पडल्या होत्या.आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्या शेण गोवऱ्या आणि चूल सरपणासाठी वणवण फिरल्या. अश्याप्रकारे रमाबाई आंबेडकर यांनी कुणालाही चाहूल न लागू देता, आपला व आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी पहाटे सूर्योदयापूर्वी आणि रात्री आठ वाजल्यानंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असत.
रमाबाई आंबेडकर यांनी आपल्या जीवनात खूप कष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे दु:ख देखील सलग उपभोगले होतं. जीवनात केलेल्या अपार कष्टांमुळे त्यांचे शरीर पोखरून गेले होते. त्यांचे आजार बळावले होते.
१९३५ साली त्यांचा आजार वाढतच गेला आणि मे १९३५ मध्ये तर त्यांचा आजार खूपच विकोपाला गेल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांकित डॉक्टरांना पाचारण केले होते.
त्यांच्या तब्येतीत कुठलीच सुधारणा होत नव्हती. बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून राहत असतं. असेच काही दिवस सुरु असतांना २७ मे १९३५ साली रमाबाई आंबेडकर यांची आजारपणामुळे प्राणज्योत मावळली.
यातून अस म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष आणि त्यांनी दिलेलं बलिदान खूप सर्वोच्च आहे.
आज हा सर्व इतिहास नव्वद वर्षे जुना आहे असे वगैरे वाटून दुर्लक्ष करणे ही मोठी चुक ठरेल.
आज समाजातील सर्वच स्तरातील वाढत्या सबबींचा पाढा देखील एक समस्याच आहे.
रमाबाईंनी एवढे भोगत असतानादेखिल त्यांचे समाजकार्य अथक चालू ठेवले होते हाही धडा आजच्या सामाजिक शिक्षणात पहिल्या पानावर यायला हवा असाच..!
पतीपत्नीची अशी समाज उद्धारु पहाणारी जबरदस्त प्रेमकहाणी ती कोणती असेल दुसरी..!
बाबासाहेबांना संविधानाद्वारे देशातील समाज समानतेच्या तराजुत तोलत घडवायचा होता आणि त्यांच्या या विचाराच्या ध्यासाच्या आड कौटुंबिक जीवन येऊ नये म्हणून रमाबाईंना स्वतःचा मानसिक,आर्थिक आणि सामाजिक तोल जपायचा होता.
सबबी देणार्या आजच्या मानवी वृत्तीला रमाबाईंचे चरित्र नक्कीच फुंकर घालेल…आणि चेतवेल समाज व जीवन समृद्धतेचा निखारा…..एका उबदार समाज समानतेसाठी.
सुयोग पंडित (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल)