बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास ग्रामपंचायत सरपंच खेमराज भाईप यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव सहा विरुद्ध दोन ने मंजूर झाला.
कास ग्रामपंचायत सरपंच खेमराज भाईप यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ऊपसरपंच पूर्वा पंडित, सदस्य प्रशांत कासकर,राजाराम आळवे,नयनी पंडित,सायली भाईप, पायल सातार्डेकर यांनी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे अविश्वास ठराव सादर केला होता.अविश्वास ठराव सादर केल्याने कास गावामध्ये चर्चेला उधाण आले होते.ठराव संमत होणार कि नाही याकडे कास ग्रामस्थांचे लक्ष लागले होते.
अखेर आज तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी कास ग्रामपंचायत मध्ये येवुन चाचपणी करुन अविश्वास ठराव मंजूर केला.सरपंच निवडणूक होईपर्यंत उप सरपंच पूर्वा पंडित कार्यभार साभांळणार आहेत.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग,बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,विकी केरकर,पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,सिध्दार्थ माळकर, आर.पी.तेली,पोलीस पाटील प्रशांत पंडित,ग्रामस्थ देवीदास सातार्डेकर, प्रविण पंडित,श्रीकांत पंडीत,आत्माराम कासकर,भगवान पंडित,विठ्ठल पंडित, समीर किनळेकर,केशव पंडित,नंदु कासकर,जयवंत पंडित,बाळु राणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.